मुक्तपीठ टीम
सोशल मिडीया हा संपूर्ण जगात एक प्रभावी माध्यम बनला आहे. ट्विटरची खरेदी केल्यानंतर एलॉन मस्क यांनी कंपनीत अनेक मोठे बदल केले आहेत. मस्क सतत कंपनीमध्ये काही विचित्र असे बदल करत आहेत. पण कंपनीच्या कर्मचार्यांपासून ते ट्विटरच्या यूजर्संना मस्कचे हे बदल फारसे आवडलेले नाहीत.
#RIPTwitter ट्विटर बंद होण्याबद्दल मस्क काय म्हणतात?
- ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी म्हटले आहे की, सोशल मीडिया कंपनीच्या भवितव्याबद्दल त्यांना फारशी चिंता नाही कारण सर्वोत्तम लोक कंपनीसोबत आहेत.
- मस्क यांनी दिलेल्या मुदतीनंतर शेकडो कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली आहे.
- ट्विटरने कर्मचाऱ्यांना संदेश पाठवला होता की ते पुढील काही दिवस कार्यालयीन इमारती बंद करत आहेत, त्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली.
- मस्क यांनी कर्मचाऱ्यांना ट्विटर सोडायचे की कंपनीसोबत राहायचे हे ठरवण्यासाठी वेळ दिला होता.
- त्यानंतर शेकडो कर्मचाऱ्यांनी कंपनीचा निरोप घेऊन तीन महिन्यांसाठी नुकसानभरपाई घेण्याचा निर्णय घेतला.
ट्विटर यूजर्सचे मस्क यांना प्रश्न…
- मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरच्या यूजर्सनी ट्विट करून मस्क यांनी विचारले की, ट्विटर बंद होणार का?
- प्रत्युत्तरात, मस्क यांनी ट्विट केले की, सर्वोत्तम लोक ट्विटरमध्ये राहतात. मला विशेष काळजी वाटत नाही.
ट्विटरने ईमेलद्वारे जाहीर केले की, ते कार्यालयीन इमारती बंद ठेवतील आणि कर्मचार्यांना प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय काही महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडू नये यासाठी मस्क आणि त्यांचे सल्लागार बैठक घेणार आहेत.