मुक्तपीठ टीम
एसी शब्द ऐकताच आठवतो तो थंडावा. पण हा थंडावाच जीवघेणा ठरला आहे. हो, हे घडलं आहे. लखनौच्या इंदिरा नगर येथील सेक्टर १८ सी-ब्लॉकमध्ये रात्रीच्या सुमारास निवृत्त आयजी दिनेश चंद्र पांडे यांचा घरात धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. त्यांची पत्नी आणि मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांना राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसा एसीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे या घटनेचे कारण स्पष्ट होत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
- निवृत्त आयजी दिनेश चंद्र पांडे यांचे वय ७१ वर्षे होते. ते इंदिरा नगर सेक्टर-१८ येथे ६८ वर्षीय पत्नी अरुणा पांडे आणि ३२ वर्षीय मुलगा शशांक पांडे यांच्यासोबत तो राहत होते.
- जेवण करून तिघेही एकाच खोलीत झोपले.
- रात्री साडेदहाच्या सुमारास दुसऱ्या खोलीतील एअर कंडिशनरला आग लागली. यामुळे त्या खोलीतील संपूर्ण सामान जळू लागले.
- ज्या खोलीत दिनेशचंद्र पांडे कुटुंबासह झोपले होते, त्या खोलीत दुसऱ्या खोलीतून धूर निघत होता.
- गुदमरल्याने तिघेही खोलीतच बेशुद्ध पडले.
- दिनेशचंद्र पांडे यांचा एक मुलगा परदेशात राहतो.
धूर पाहून भाडेकरू आणि स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली
- घरात सर्वत्र धुराने पसरला होता.
- तळमजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूने आरडाओरडा केला असता, स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली.
- घटनेची माहिती मिळताच नजीकच्या अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
- एसीपी गाजीपूर विजयराज सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा तिघेही बेशुद्ध पडले होते.
- सर्वांना तातडीने बाहेर काढून लोहिया रुग्णालयात नेण्यात आले. जिथे दिनेशचंद्र पांडे यांचा मृत्यू झाला.