Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उद्धव ठाकरे, आज शेतकऱ्यांची माफी मागणार?

September 5, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
Marathwada Tour

केशव उपाध्ये/ मुख्य प्रवक्ते, महाराष्ट्र भाजपा

उध्दव ठाकरे हे आज मराठवाडा दौऱ्यावर शेतकऱ्यांना भेटायला जात आहेत. जरूर जावे पण काही प्रश्नांची उत्तरे ही द्यावीत!

चिपळूण येथील अपरांत रुग्णालयात मागील वर्षी जुलै महिन्यात पूर परिस्थितीमुळे मरण पावलेल्या ८ कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना विशेष बाब म्हणून प्रत्येकी ४ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली होती. पुढे एक वर्ष उलटल्यानंतरही ही मदत मिळालीच नाही. तुमच्या पोकळ आश्वासनावर आपत्तीग्रस्तांनी आज प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर देणार?

वारंवार संकटे येत आहेत हे लक्षात घेऊन सर्व संबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल, अशी घोषणा आपण गेल्या वर्षी २५ जुलै रोजी केली होती. तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात पुढील वर्षभरात ही घोषणा कोणत्या बासनात बांधली?

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसण्याची गरज होती तेव्हा मुख्यमंत्री असूनही तुम्ही पुलावर अंथरलेल्या रेड कार्पेटवर उभे राहून मदतीची केवळ आश्वासने दिलीत. तेव्हा संकटात खचलेला शेतकरी पुढे वर्षभरात सावरावा यासाठी तुमच्या सरकारने काय केले?

शेतकऱ्यांना वरदान ठरलेली जलयुक्त शिवार ही शेततळी योजना बंद करून शेतकऱ्याचे पाणी तोडल्यावर तुम्ही ४ फेब्रुवारी २०२१ रोजी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राबविण्याची घोषणा केली होती. पुढच्या दीड वर्षात या घोषणेचे कागदी घोडे कोणत्या बासनात बांधले?

– जिरायत, बागायत जमिनीसाठी ₹ ६,८०० प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे. त्यामुळे आम्ही ती दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ₹ १०,००० देणार, फळपिकांसाठी १८,००० रुपये प्रति हेक्टर ऐवजी २५,००० रुपये प्रति हेक्टर (२ हेक्टरच्या मर्यादेत) मदत करण्यात येईल. असे २३ ऑक्टोबर २०२० रोजी जाहीर केले होते. दोन वर्षांनंतरही अनेक शेतकऱ्यांना ही मदत मिळालीच नाही. याची जबाबदारी घेऊन आज शेतकऱ्यासमोर माफी मागणार का?

keshav

केशव उपाध्ये हे भजपाचे प्रवक्ते आहेत. ते पक्षाचे विचार मांडतात आणि मराठी आणि हिंदी राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांसह विविध व्यासपीठांवर आक्रमकपणे पक्षाचा बचाव करतात.


Tags: BJPfarmersKeshav UpadhyayMaharashtraMarathwada TourmuktpeethShivSena Chief Uddhav Thackerayकेशव उपाध्येभाजपामराठवाडा दौरामहाराष्ट्रमुक्तपीठव्हा अभिव्यक्तशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेशेतकरी
Previous Post

दिवाळीचा ‘आनंदाचा शिधा’ वितरण आजपासून ऑफलाईन पध्दतीने होणार – रविंद्र चव्हाण

Next Post

सावधान! एसीची आग करू शकते घात…माजी आयजींचा गुदमरून मृत्यू!!

Next Post
Former IG Dinesh Chandra Pandey

सावधान! एसीची आग करू शकते घात...माजी आयजींचा गुदमरून मृत्यू!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!