तुम्ही मुंबई किंवा नागपूरमध्ये असाल तर तुम्ही ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’मधील खाद्यपदार्थांचा आस्वाद नक्की घ्या. कारण रेल्वेने त्यासाठी मस्त शानदार सोय केली आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ची अनोखी संकल्पना सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर ती नागपुरातही राबवली.