Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एकनाथ शिंदे म्हणतात “शिवसेना सोडणार नाही…” म्हणजे शिवसेना विधिमंडळ पक्ष ताब्यात घेण्याची रणनीती?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
shivsena issuse

मुक्तपीठ टीम

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपाबरोबर युती करण्याची अट शिंदे यांनी घातल्याने महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह सूरतमधून आज सकाळी गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. गुवाहाटी विमानतळावर दाखल होताच एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सेना आमदारांनी कोणतंही बंड केलेलं नाही किंवा आम्ही पक्षही सोडलेला नाही, असे सांगितले. त्यामागे शिवसेना विधिमंडळ पक्षच ताब्यात घेण्याची रणनीती असण्याची शक्यता आहे. म्हणजे विधिमंडळात एकनाथ शिंदेंचाच शिवसेना पक्ष खरा, असा दावा केला जाईल.

शिवसेनेचे ४० आमदार माझ्यासोबत, एकनाथ शिंदेंचा दावा!

  • शिवसेनेचे ४० आमदार माझ्यासोबत आहेत.
  • आम्ही सर्व जण बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि भूमिका पुढे घेऊन जाणार आहोत.
  • मला कोणावर टीका करायची नाही.
  • इथे शिवसेनेचे आमदार आहेत आणि आम्हाला बाळासाहेबांचे हिदुत्व पुढे घेऊन जायचे आहे.
  • माझ्यासोबत ४० आमदार इथे आले आहेत आणि आणखी १० येणार आहेत.

बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार असल्याचा पुनरुच्चार…

  • शिवसेनेने कुठलेही बंड केलेले नाही.
  • शिवसेना आमदारांनी कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही.
  • बाळासाहेबांचे आणि हिंदुत्वाचे विचार यापासून शिवसेना आमदार कधीही फारकत घेणार नाहीत.
  • मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झालेली आहे.
  • बाळासाहेबांचा नारा हा बुलंद केला जाईल. बाळासाहेबांचे हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत.

कायदा काय सांगतो?

  • एकनाथ शिंदे शिवसेना सोडणार नाही, असं म्हणणं हे शिवसेनेच्या नेतृत्वासाठी जास्त धोकादायक ठरू शकतं.
  • जर शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी १/३ म्हणजे ३७ आमदारांचं बळ एकनाथ शिंदेंकडे असेल, तर त्यांच्या सोबत बंड केलेल्या आमदारांची पदं वाचतील.
  • तेवढेच नाही तर एकनाथ शिंदेंकडे शिवसेना विधिमंडळ पक्षातील २/३ आमदार त्यांच्यासोबत असल्याने त्यांच्या गटाला शिवसेना विधिमंडळ पक्ष म्हणून मान्यता मिळेल.
  • त्याचवेळी शिवसेनेशी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या आमदारांचं स्थान वेगळा गट असेल.
  • मात्र, एकनाथ शिंदे दावा करत असले तरी त्यांच्याकडे ३७ आमदार आहेत का, हा महत्वाचा मुद्दा आहे.
  • कारण सध्या त्यांच्यासोबतचे गीता जैन, बच्चू कडू, राजकुमार पटेल आणि अन्य काही आमदार हे शिवसेनेच्या कोट्यात मोजले जाणार नाहीत.
  • तसेच आता त्यांच्या सोबत असलेले सर्व आमदार नंतरही त्यांच्यासोबतच राहतील का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
  • त्यामुळे एकनाथ शिंदेंकडून ३७ या २/३ आमदार संख्येपेक्षा जास्त म्हणजे ४०पर्यंत निव्वळ शिवसेना आमदारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी शक्यता आहे.
  • त्यामुळे इतरांना आपल्यासोबत घेण्यासाठी आताच जास्त आमदारांची संख्या वाढवून वातावरण निर्मिती केली जात असण्याची शक्यता आहे.

Tags: assamBalasaheb thackerayEknath ShindeShivsainikShivsenaआसामएकनाथ शिंदेबाळासाहेब ठाकरेशिवसेनाशिवसैनिक
Previous Post

Restaurant On Wheels: रेल्वेची चवदार सेवा!

Next Post

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात २५ जूनपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

Next Post
Rainy Season

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात २५ जूनपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!