मुक्तपीठ टीम
नव्या कृषी कायद्यांविरोधात गेले अनेक महिने दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाला होता. यावेळी एका गटाने लाल किल्ल्याला घेराव घालून पोलिसांना मारहाण आणि धार्मिक ध्वज फडकावला होता. आता या हिंसाचाराप्रकरणी आणखीण एका मुख्य आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीच्या घरातून तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता दीप सिद्धूला पोलिसांनी अटक केली आहे.
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपीचे नाव महिंदर सिंग उर्फ मोनी असे आहे. ३० वर्षीय मोनी दिल्लीतील स्वरूप नगर येथील रहिवासी असून त्याला पितम पुरा बस स्थानकाजवळ दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकांने अटक केली आहे.
मोनीच्या घराच्या घेतलेल्या झडतीमध्ये पोलिसांना दोन तलवारी सापडल्या. त्या तलवारी पोलिसांनी जप्त केल्या असून महिंदर याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारात दीप सिद्धूसह महिंदर सिंग सुद्धा मुख्य आरोपी असल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
A most wanted person in Red Fort violence case, Maninder Singh (in pics), arrested by Delhi Police Special Cell yesterday in Delhi. Two swords recovered from his house.
(Pic 1 – screengrab from a video released by Delhi Police)
(Pic 2 – accused’s pic released by Delhi Police) pic.twitter.com/8Ok8R9ey1Y— ANI (@ANI) February 17, 2021
ट्रॅक्टर रॅलीचे रुपांतर हिंसाचारात
- प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारच मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती.
- ट्रॅक्टर रॅली काढल्यानंतर अचानक एक गट लाल किल्ल्याकडे गेला.
- त्यानंतर लाल किल्ल्यावर हिंसाचार उफाळून आला होता. या घटनेचे तीव्र पडसाद नंतर उमटले.
- लाल किल्ल्यावरील हिंसाचारामागे दीप सिद्ध असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला होता.
- दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच दीप सिद्धूला अटक केली होती.