मुक्तपीठ टीम
केरळमधील तिरुअनंतपुरम येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेला देशातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण बरा झाला आहे. त्या राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी शनिवारी ही माहिती दिली. कोल्लम येथील ३५ वर्षीय रहिवासी रुग्णाला आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील मंकीपॉक्सची ही पहिलीच घटना असल्याने राष्ट्रीय विषाणूशास्त्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ७२ तासांच्या अंतराने दोनदा चाचण्या घेण्यात आल्या.
मंकीपॉक्सच्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर
- मंकीपॉक्सच्या चाचणीत सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत.
- रुग्ण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी आहे.
- त्याची सूज/गाठ पूर्णपणे बरी झाली आहे.
- रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
- त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबीयांच्या तपासणीचे निष्कर्षही नकारात्मक आहे.
- उर्वरित दोन रुग्णांची प्रकृतीही समाधानकारक आहे.
कर्नाटकात मंकीपॉक्सचे संशयास्पद प्रकरण आले समोर
- कर्नाटकात शनिवारी मंकीपॉक्सची एक संशयित घटना समोर आली आहे.
- राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले की, मंकीपॉक्सच्या संसर्गाची लक्षणे असलेल्या व्यक्तीला येथील खासगी रुग्णालयात अलगावमध्ये ठेवण्यात आले आहे.
- संशयित रुग्ण इथिओपियाचा नागरिक आहे.
- रुग्णाचे नमुने पुष्टीकरणासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे येथे पाठवण्यात आले आहेत.
देशात मंकीपॉक्सची ४ प्रकरणे
- केंद्र सरकारने शुक्रवारी पुष्टी केली की २७ जुलैपर्यंत देशात मंकीपॉक्सची चार प्रकरणे आहेत.
- तीन केरळ आणि एक दिल्लीतून आहेत.
- लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी स्पष्ट केले की, देशात मंकीपॉक्समुळे मृत्यूची एकही घटना नोंदवलेली नाही.
- देशातील काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मे महिन्यापासून कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.