Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सोलर पॅनल निर्मितीचा महाप्रकल्प भारतात, चीनवरील परावलंबित्व संपणार

रिलायन्स पॅनल निर्मिती प्रकल्प उभारणार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
mukesh ambani

मुक्तपीठ टीम

सौर ऊर्जा ही अक्षय ऊर्जा…भारतात तर वर्षात सर्वाधिक काळ भरपूर उपलब्ध. पण तिच्यासाठी लागणारे सोलर पॅनलसाठी आपल्यासह जगाला चीनवर बऱ्यापैकी अवलंबून राहावं लागतं. पण रिलायन्सच्या पुढाकारामुळे आता चीनवरील परावलंबित्व संपणार आहे. त्यांचा प्रकल्प उभारला गेला की भारत सोलर पॅनलचा जागतिक पुरवठादार बनू शकेल.

 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सौर ऊर्जेच्या क्षेत्रात भारताला पूर्णपणे स्वावलंबी करण्यासाठी ७५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. त्याचवेळेस अमेरिकेनेही चिनी कंपन्यांकडून सोलार पॅनल आयात करण्यास बंदी जाहीर केली आहे. त्यामुळे रिलायन्ससाठी अमेरिकेचाही मोठा बाजार उघडा होणार आहे.

 

रिलायन्स इंडस्ट्रीजचा सोलर पॅनल प्रकल्प

  • गुजरातमधील जामनगर येथे ५,००० एकरवर धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्स उभारला जात आहे.
  • हा प्रकल्प चीनच्या सर्वात मोठ्या सौर उपकरणांच्या संयंत्रापेक्षा जास्त किंवा त्याहून मोठा असेल.
  • सौर ऊर्जा क्षेत्रातील सर्व उपकरणे आणि त्यासाठी आवश्यक साधने येथे तयार केली जातील.
  • पॉलिसिलीकॉन तसेच इतर कच्च्या मालाचे उत्पादनही केले जाईल.

 

पॉलिसिलीकॉनची निर्मिती अत्यंत उच्च तंत्रज्ञानाने केली जाते. यासाठी रिलायन्स कंपनी जगातील काही प्रमुख कंपन्यांशी चर्चा करत आहे. तसेच म्हटले जात आहे की, “कच्चा माल ही समस्या नाही. परंतु, पॉलिसिलीकॉन उत्पादनासाठी अत्यंत उच्च दर्जाचे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असणारा कारखाना उभारण्याचे आव्हान आहे.” रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सध्याच्या कारखान्यात हरित उर्जा संबंधित अनेक प्रकारचे कच्चे माल उपलब्ध होणार आहेत. एकाच कॉम्प्लेक्समध्ये कच्च्या मालापासून तयार वस्तूंसाठी उत्पादन केल्याने संपूर्ण खर्चासाठी चीनशी स्पर्धा करण्यास मदत होईल.

 

रिलायन्सची नजर सोलरवर…

  • सन २०३० पर्यंत सौरऊर्जेपासून २.८० लाख मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य आहे.
  • गेल्या वर्षापर्यंत भारताने ८० टक्के सोलार सेल्स, सोलार पॅनल आणि सौर ऊर्जेमध्ये वापरल्या गेलेल्या सोलार मॉड्युल्सची चीनकडून आयात केली.
  • भारतातील सोलार मॉड्यूलच्या किंमतीत वाढ झाल्याने, प्लांटची किंमत आणि त्यातून निर्माण होणारी वीज ही वाढत आहे.
  • भारतात तयार केलेली सोलार उपकरणे चीनपेक्षा ४० टक्क्यांनी महाग आहेत.
  • चीन सध्या भारतापेक्षा सौर ऊर्जेच्या उत्पादनासाठी ३० ते ४० टक्के स्वस्त उपकरणे पुरवतो.
  • रिलायन्सच्या संपूर्ण योजनेचा उद्देश असा आहे की, येत्या तीन वर्षात चीनपेक्षा स्वस्त आणि टिकाऊ उपकरणे भारतात तयार झाली पाहिजेत.

 


Tags: mukesh ambaniमुकेश अंबानीरिलायन्स इंडस्ट्रीजसोलार मॉड्यूल
Previous Post

दिव्यांगांच्या लसीकरणासाठी सुरक्षित आणि निर्जंतुक रिक्षा सेवा

Next Post

पिनाका रॉकेट सिस्टमची यशस्वी चाचणी! ४४ सेकंदात ७२ रॉकेट्स!

Next Post
Pinaka

पिनाका रॉकेट सिस्टमची यशस्वी चाचणी! ४४ सेकंदात ७२ रॉकेट्स!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!