Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पिनाका रॉकेट सिस्टमची यशस्वी चाचणी! ४४ सेकंदात ७२ रॉकेट्स!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Pinaka

मुक्तपीठ टीम

स्वदेशी तंत्रज्ञानाने निर्मित पिनाका रॉकेट सिस्टमचे डीआरडीओद्वारे यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. संरक्षण संशोधन व विकास संघटना म्हणजेच डीआरडीओने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. ओडिशा येथील चांदीपूर एकीकृत चाचणी परिक्षेत्रात रॉकेट सिस्टमची चाचणी घेण्यात आली आहे. चाचणीदरम्यान २५ रॉकेट्स सोडण्यात आले आहेत. त्यांनी लक्ष्य साध्य करण्यात यश मिळाले आहे. पिनाका प्रणाली ४४ सेकंदात ७२ रॉकेट प्रक्षेपित करू शकते.

 

स्वदेशी बनावटीचे पिनाका ही गायडेड रॉकेट लॉन्च सिस्टमची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. जी पिनाका एमके-१ रॉकेटची जागा घेईल. या प्रणालीच्या मदतीने ४५ किमी अंतरावर असणारे लक्ष्य नष्ट केले जाऊ शकते.

 

सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड नाही

  • लार्सन अँड टुब्रो डिफेन्स आणि टाटा पॉवर स्ट्रॅटेजिक इंजिनीअरिंग विभागाने पिनाका तयार केले.
  • पिनाका प्रणालीच्या पथकात ६ प्रक्षेपण वाहने असतात.
  • तसेच लोडर सिस्टम, रडार आणि लिंक विथ नेटवर्क सिस्टम आणि कमांड पोस्ट देखील असते.
  • टेलिमेट्री, रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टम अशा अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने सर्व क्षेपणास्त्रांना ट्रॅक केले जाते.
  • ही प्रणाली ४४ सेकंदात ७२ रॉकेट प्रक्षेपित करू शकते.

 

भगवान महादेवांचं शस्त्र म्हणजे ‘पिनाका’

  • भगवान शंकराचे शस्त्र, त्यांचे धनुष्य ‘पिनाका’ या नावाने ही प्रणाली बनविली गेली आहे.
  • राजस्थानातील पोखरण परिक्षेत्रात मार्च महिन्यात पिनाका रॉकेट सिस्टमच्याही यशस्वी चाचण्या झाल्या.
  • आता ओडिशामधील यशस्वी चाचणी ही सैन्याला महाबळ देण्याच्या दिशेने एक निश्चित पाऊल म्हणून मानले जात आहे.
  • ही संरक्षण यंत्रणा एलओसीवर तैनात करण्याच्या उद्देशाने विकसित केली गेली आहे.

 

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओच्या पिनाका रॉकेटच्या यशस्वी चाचणीबद्दल अभिनंदन केले आहे. जी. सतीश रेड्डी, सचिव, संरक्षण संशोधन व विकास विभाग आणि अध्यक्ष, डीआरडीओ, यांनी चाचण्यांच्या यशाबद्दल प्रत्येकाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.


Tags: Defense Minister Rajnath SinghDRDOPinaka rocket systemपिनाका रॉकेटसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह
Previous Post

सोलर पॅनल निर्मितीचा महाप्रकल्प भारतात, चीनवरील परावलंबित्व संपणार

Next Post

नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये ८६ जागांसाठी भरती

Next Post
Nabard

नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये ८६ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!