मुक्तपीठ टीम
सध्याचा काळ हा पारंपरिक इंधनांचा वापर टाळत सोलर, पवन अशा अपारंपरिक उर्जास्त्रोतांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणारा. त्यामुळे वर्तमानातील इंधनाच्या फायदेशीर व्यवसायात असणाऱ्या मोठ्या दिग्गजांनी आता अपारंपरिक उर्जा क्षेत्राकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. रिलायन्सने सोलर पॅनलच्या उद्योगाकडे पाऊल उचलले असतानाच आता देशभर ई-वाहनांच्या चार्जिंगसाठी आवश्यक चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याच्या बाजारपेठेवरही लक्ष दिले आहे. ब्रिटनमधील ब्रिटिश पेट्रोलियमला सोबत घेत रिलायन्सने या नव्या बाजारपेठेत मुसंडी मारण्याची योजना आखली आहे.
ई-चार्जिंगची बिझनेस पॉवर
- रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ब्रिटनची नावाजलेली एनर्जी कंपनी बीपी एकत्र आले आहेत.
- त्यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या जिओ-बीपीने भारतातील पहिले आणि सर्वात मोठे ऑल-इलेक्ट्रिक राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म ब्लूस्मार्टसह भागीदारीची घोषणा केली आहे.
- या भागीदारीमुळे, देशभरात मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक ईव्ही चार्जिंग स्टेशन नेटवर्क स्थापित केले जाणार आहेत.
- जियो-बीपी देशभरातील प्रवासी इलेक्ट्रिक वाहने आणि ताफ्यांसाठी ही स्थानके उभारणार आहेत.
जियो-बीपी नेमकं काय करणार?
- या भागीदारीद्वारे, दोन्ही कंपन्या ब्लूस्मार्टचे ज्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्तित्व निर्माण आहे, त्या सर्व शहरांमध्ये ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासावर एकत्र काम करण्यात येईल.
- पहिला टप्पा दिल्ली परिसरात राबवला जाईल, जिथे प्रत्येक स्टेशनवर एका वेळी ३० वाहने चार्ज करण्याची क्षमता असेल.
- भारतातील प्रमुख शहरांमध्ये नेटवर्क वाढवण्यासाठी ब्लूस्मार्ट दिल्ली-एनसीआरच्या सर्व-इलेक्ट्रिक फ्लीटसह मोबिलिटी क्षेत्रात हालचाल करत आहे.
- इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वात मोठा ताफा चालवणाऱ्या ब्लूस्मार्टने भारतातील इतर प्रमुख शहरांमध्ये आपले नेटवर्क वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
ब्लूस्मार्ट उभारणार जगातील सर्वात मोठे ईव्ही सुपरहब
- ब्लूस्मार्ट मोठे ईव्ही चार्जिंग सुपरहब्स चालवते.
- जियो-बीपी भागीदारीत भारतात जागतिक दर्जाचे ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारतील.
- ईव्ही सुपरहब्स हे ईव्ही चार्जिंगचे भविष्य आहे.
- यामुळेच जगातील सर्वात मोठे ईव्ही सुपरहब तयार करण्यासाठी जियो-बीपी सोबत काम करण्याची योजना आहे.