Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बहुतांश जिल्ह्यात लम्पीबाधित जनावरांच्या संख्येत घट – सचिंद्र प्रताप सिंह

October 20, 2022
in चांगल्या बातम्या, सरकारी बातम्या
0
Lumpy

मुक्तपीठ टीम

राज्यात गेल्या ३-४ दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यांत लम्पी आजाराच्या नवीन व गंभीर प्रकरणांमध्ये घट झाल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

सचिंद्र प्रताप सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या  बैठकीमध्ये लम्पी आजाराचा राज्यातील सद्यस्थितीबाबत विस्तृत आढावा घेण्यात आला.

सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले की, गत आठवडाभरातील पाऊस व त्यामुळे निर्माण झालेल्या पावसाळी वातावरणामुळे कीटकांची वाढ, लम्पीच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल ठरत होती.  पावसाळी वातावरण व खालावलेल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे दैनंदिन बाधित जनावरांची संख्या व मृत्यूमध्ये वाढ झाली होती. अनेक गावांमध्ये पशुपालकांनी गाभण गायींच्या लसीकरणास केलेला विरोध तसेच ४ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या वासरांना लसीकरण करणे निर्देशीत नसल्यामुळे वासरांमध्ये रोगप्रादुर्भाव अधिक होता. विभागाकडून सुरू असलेल्या औषधोपचारामुळे गेल्या ३-४ दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यांमध्ये रोजच्या नवीन व गंभीर प्रकरणांमध्ये घट दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने दि. ७ ऑक्टोबर, २०२२ रोजी कीटक नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यभरात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवाव्यात. पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि. १७ ऑक्टोबर, २०२२ रोजी दिलेल्या सुधारीत उपचार शिफारशींनुसार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन जनावरांना औषधोपचार व लसीकरण करावे, शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे सर्व पशुपालकांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना जनावरांवरील उपचारासाठी सहकार्य करावे, असेही श्री. सिंह यांनी सांगितले.

राज्यात दि. १९ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत ७ हजार ३९४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी आवश्यक खबरदारी घ्यावी. लम्पीचा उपचार लक्षणे दिसल्यानंतर वेळीच सुरू झाल्यास बहुतांश जनावरे उपचाराला चांगला प्रतिसाद देतात. सर्व पशुपालकांनी लम्पीच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

राज्यामध्ये दि. १९ ऑक्टोबर, २०२२ अखेर ३२ जिल्ह्यांमधील एकूण २ हजार ८२० गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण १ लाख १८ हजार ३१३ बाधित पशुधनापैकी एकूण ७५ हजार ११८ पशुधन उपचाराद्वारे रोगमुक्त झाले आहे.  उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत.

 राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण १४०.९७ लाख लसमात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून एकूण १३३.१२ लाख पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर, सांगली, वाशिम, जालना, हिंगोली आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारीनुसार राज्यात सुमारे ९५.१४% गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे.


Tags: lumpy skin diseaseMaharashtraSachindra Pratap Singhमहाराष्ट्रलम्पी त्वचा रोगसचिंद्र प्रताप सिंह
Previous Post

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून मराठा समाजातील व्यक्तींना बिनव्याजी कर्ज – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

मुंबईतील रुग्णालयांचा कायापालट करणार – मंत्री दीपक केसरकर

Next Post
पालकमंत्री यांची कामा रुग्णालयाला भेट 1 (1)

मुंबईतील रुग्णालयांचा कायापालट करणार - मंत्री दीपक केसरकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!