Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईतील रुग्णालयांचा कायापालट करणार – मंत्री दीपक केसरकर

सर जे. जे., कामा रुग्णालयाला पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट

October 20, 2022
in सरकारी बातम्या
0
पालकमंत्री यांची कामा रुग्णालयाला भेट 1 (1)

मुक्तपीठ टीम

सर जे. जे. रुग्णालय व कामा रुग्णालयातील विद्यार्थी तसेच रुग्णांना आवश्यक असणाऱ्या अद्ययावत सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्यात येण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) व राज्य शासनाच्या वतीने निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. सर जे. जे. रुग्णालय व कामा रुग्णालयांना भेटी दरम्यान मंत्री दीपक केसरकर बोलत होते. आगामी काळात मुंबईतील रुग्णालयांचा पायाभूत व मुलभूत सुविधांसह कायापालट झाला पाहिजे, यादृष्टीने प्रयत्न व्हावे, अशा सूचनाही त्यांनी रुग्णालयांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

पालकमंत्रीदीपक केसरकर यांनी सर जे. जे. रुग्णालय व कामा रुग्णालयांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली व रुग्णालयासाठी आवश्यक साधनसुविधा याबाबत माहिती जाणून घेत परिस्थितीचा आढावा घेतला. सर जे. जे. रुग्णालयात कार्डिओलॉजी विभाग, नवीन कॅथलॅब, सर्जिकल विभाग, ओपीडी विभाग तसेच रुग्णांसाठीचे स्वयंपाकगृह, सर जे.जे. मार्ग पोलीस ठाणे या ठिकाणी भेट देवून प्रत्यक्ष पाहणी केली. तेथील सोयी सुविधांबाबत माहिती जाणून घेतली.

यावेळी मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, उपअधिष्ठाता डॉ. अशोकानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरवसे, कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे, मुंबई शहरचे जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष माने यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सर जे. जे. रुग्णालयातील सद्यस्थितीतील उपलब्ध सोयी सुविधा व रुग्णालयाच्या समस्यांबाबत रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सापळे यांनी मंत्री दीपक केसरकर यांना अवगत केले.

मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, सर जे. जे. महाविद्यालयातील शिकणारे विद्यार्थी व रुग्णांना लागणाऱ्या व विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये आवश्यक अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समिती व राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. जे. जे. रुग्णालयाचा परिसर जुना असून येथील बऱ्याच वस्तू जुन्या व जीर्णावस्थेत आहेत. विद्यार्थी वसतिगृहाच्या ठिकाणी दर्जेदार सुविधा उपलब्ध करणे, वीजेची व्यवस्था करणे, इमारतीचे रंगकाम करणे अशा विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


Tags: Deepak KesarkarMadam Cama HospitalMumbai HospitalsSir JJ Hospital
Previous Post

बहुतांश जिल्ह्यात लम्पीबाधित जनावरांच्या संख्येत घट – सचिंद्र प्रताप सिंह

Next Post

राज्यातील अतिवृष्टीचा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला आढावा

Next Post
Abdul Sattar

राज्यातील अतिवृष्टीचा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!