मुक्तपीठ टीम
रेडमीने अलीकडेच भारतात आपला जबरदस्च रायटिंग पॅड लॉंच केला आहे. हा रायटिंग पॅड मोठ्या डिस्प्ले आणि उत्तम बॅटरी पॅकसह येतो. या रायटिंग पॅडचे फिचर म्हणजे त्याचे वजन आणि स्टाईल आहे. या डिव्हाइसचा डिजिटल नोटपॅडसारखा वापर करता येतो. जर तुम्हाला नोट्स बनवण्याची सवय असेल तर हा रेडमी रायटिंग पॅड उपयोगी ठरू शकतो.
रेडमी रायटिंग पॅडची फिचर्स काय आहेत?
- रेडमीच्या या नवीन उत्पादनात अनेक फिचर्स आहेत.
- हा डिव्हाइस स्मार्टफोनच्या वजनाच्या निम्म्याहून कमी आहे.
- रेडमीच्या या नोटपॅडमध्ये पेन देखील सपोर्ट करण्यात आला आहे, ज्यामुळे ते वापरण्यास अतिशय सोपे झाले आहे.
- या पोर्टेबल डिजिटल नोटपॅडवर केवळ नोट्सच नव्हे तर डूडल देखील बनवता येतात ज्यामुळे ते सामान्य नोटपॅडपेक्षा अनेक पटीने चांगले बनते.
रेडमी रायटिंग पॅडची किंमत
- रेडमीने हा रायटिंग पॅड अतिशय स्वस्त दरात लॉंच केला आहे.
- या इलेक्ट्रॉनिक उपकरणाची किंमत फक्त ५९९ रुपये आहे.
- हा रायटिंग पॅड mi.com वरून ऑनलाइन खरेदी करू शकता.
या रायटिंग पॅडमध्ये रेडमीने ८.५-इंचाचा LCD डिस्प्ले वापरला आहे. या स्क्रीनमधून कोणताही प्रकाश येत नाही, ज्यामुळे तुम्ही बराच वेळ वापरलात तरी तुमच्या डोळ्यांना कोणतीही इजा होणार नाही. हे डिव्हाइस खूपच स्लिम आणि स्लीक आहे. या डिव्हाइसमध्ये लॉक स्विच फिचर देखील देण्यात आले आहे, ज्याच्या मदतीने स्क्रीनवर लिहिलेला कंटेंट डिलीट होण्यापासून वाचवू शकता.
रोडमी रायटिंग पॅड बॅटरी फिचर
- रायटिंग पॅडमध्ये काढता येण्याजोगी बॅटरी आहे परंतु, तिला पुन्हा पुन्हा बदलण्याची गरज नाही.
- एकाच वेळी बॅटरी टाकून तुम्ही त्यावर २० हजार पाने लिहू शकता.