मुक्तपीठ टीम
भारतीय तटरक्षक दलात म्हणजेच इंडियन कोस्ट गार्डमध्ये नाविक (जनरल ड्यूटी) या पदासाठी २६० जागा, नाविक (डोमेस्टिक ब्रॅन्च) या पदासाठी ५० जागा, यांत्रिक (मेकॅनिकल) या पदासाठी २० जागा, यांत्रिक (इलेक्ट्रिकल) या पदासाठी १३ जागा, यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) या पदासाठी ७ जागा अशा एकूण ३५० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २ जुलै २०२१ पासून १६ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) नाविक (जनरल ड्यूटी) या पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून गणित व भौतिकशास्त्र विषयांसह १२ उत्तीर्ण असावे. २) नाविक (डोमेस्टिक ब्रॅन्च) पदांसाठी दहावी उत्तीर्ण असावे. ३) यांत्रिक पदांसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त शाखेतून दहावी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २२ वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट https://joinindiancoastguard.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.