Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ज्योतिरादित्य शिंदे मोदी सरकारमध्ये मंत्री बनण्याची शक्यता!

रेल्वे किंवा अन्य महत्वाचे खाते मिळण्याची चर्चा

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
jyotiraditya shinde

मुक्तपीठ टीम

मध्यप्रदेशात काँग्रेसला धक्का देत भाजपात सहभागी झालेले ज्योतिरादित्य शिंदे यांना १५ महिने वाट पाहिल्यानंतर सत्तेचे फळ मिळण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या सत्ता एक्स्प्रेसमध्ये ओव्हर लोडेड झालेल्या पियूश गोयल यांच्याकडील रेल्वे खात्याची बर्थ शिंदेंना मिळण्याची चर्चा आहे. काँग्रेसमधून आलेल्या या युवा नेत्याला मोठे मंत्रीपद देण्यामागे भाजपाची काँग्रेसमधील वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या युवा नेत्यांचे भाजपा प्रवेशाचे तिकीट पक्क करण्याची भूमिका आहे. रेल्वे हे खूप मोठे खाते असल्याने जर ते देण्याविषयी काही मतभेद झाले तर इतर महत्वाचे खाते दिले जाण्याची शक्यता आहे.

 

ज्योतिरादित्य शिंदे…कमलनाथांमुळे हात सोडून कमळ!

  • ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते माधवराव शिंदे यांचे सुपुत्र
  • माधवरावांचे राजकारण ऐन भरात असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
  • त्यानंतर काँग्रेसने ज्योतिरादित्य शिंदे यांना राजकारणात सक्रिय केले.
  • पंतप्रधानपदी मनमोहन सिंह असताना काँग्रेसने सचिन पायलट, मिलिंद देवरा, जितेन प्रसाद या युवा नेत्यांप्रमाणेच ज्योतिरादित्य शिंदे यांनाही मंत्रिमंडळात महत्वाची जबाबदारी देऊन पुढचे नेतृत्व घडवण्याचा प्रयत्न केला होता.
  • मात्र, मध्यप्रदेशात सत्तांतर झाल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांच्याजागी कमलनाथ यांची निवड झाल्यापासून ज्योतिरादित्य शिंदे यांची धुसपुस सुरु होती.
  • भाजपाच्या नेत्यांनी ते हेरून गळ टाकून ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात ओढले.
  • गेले १५ मिनिटे ज्योतिरादित्य शिंदे भाजपा प्रवेशाचा लाभ मिळण्याची वाट पाहत होते, अखेर आता त्यांना सत्ता मिळण्याची शक्यता आहे.

 

मध्य प्रदेशात गेल्या वर्षी मार्चमध्ये कमल नाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारविरोधातील उठावात ज्योतिरादित्य शिंदे यांनीच महत्त्वाची भूमिका बजावली होती. राज्यसभा सदस्य असणाऱ्या शिंदे यांना मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळणे आता जवळजवळ निश्चित मानले जात आहे.

 

सर्वाधिक टीकेचे वर्ष, मंत्रिमंडळ फेरबदलाची गरज!

  • सात वर्षे पूर्ण होत असताना मोदी सरकारवर सर्वाधिक टीका झाली आहे.
  • काही फेरबदल आवश्यक मानले गेले आहेत.
  • त्याचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची तयारी करत आहेत.
  • पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासमवेत बैठक घेतली.
  • त्यानंतर शिंदेंच्या मंत्रिमंडळात समावेशाची चर्चा सुरु झाली आहे.
  • रेल्वे नाही दिले तर नगरविकास किंवा मनुष्यबळ यासारखी महत्त्वाची मंत्रालये देण्याचीही चर्चा आहे. अर्थात मनुष्यबळ हे विचार रुजवण्यासाठी वापरलं जाणार खातं असल्यानं त्याची जबाबदारी काही महिन्यांपूर्वी वेगळ्या विचारांच्या पक्षातून आलेल्या नेत्याला दिली जाईल का, हाही वादाचा मुद्दा आहे.

 


Tags: BJPCongressjyotiraditya shindeMadhya Pradeshकाँग्रेसज्योतिरादित्य शिंदेपियूश गोयलमध्यप्रदेशमोदी सरकार
Previous Post

कोस्ट गार्डमध्ये नाविक, यांत्रिकी पदांसाठी ३५० जागांवर संधी

Next Post

देशात ‘वन अर्थ वन हेल्थ’ चांगली संकल्पना, परंतु किती दिवसात मिळणार? – नवाब मलिक

Next Post
nawab malik

देशात 'वन अर्थ वन हेल्थ' चांगली संकल्पना, परंतु किती दिवसात मिळणार? - नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!