मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे येथे विविध पदांसाठी भरती आहे. एकूण ७२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण धुळे आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२१ आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार जीएनएम / बीएससी (नर्सिंग), बीएएमएस / एमडी / एमएस / डीएमएलटी / एमएसडब्ल्यू / एसएससी / आयटीआय / पदवीधर असणे आवश्यक.
वयोमर्यादा
१७ फेब्रुवारी २०२१ रोजी ३८ वर्षे. मागासवर्गीयांसाठी एससी, एसटीसाठी ०५ वर्षे सूट देण्यात आली आहे.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवर, साक्री रोड, धुळे
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गासाठी १५० रुपये तर मागासवर्गीयांसाठी १०० रुपये शुल्क आकारलेले आहेत.
या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकृत वेबसाइट https://arogya.maharashtra.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.