अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्समध्ये प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी १३९ जागांची भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ४ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतात. प्राध्यापक पदासाठी २७ जागा, अतिरिक्त प्राध्यापक पदासाठी २२ जागा, सहयोगी प्राध्यापक पदासाठी ३१ जागा, सहायक प्राध्यापक पदासाठी ५९ जागा एकूण १३९ जागांसाठी भरती आहे.
शैक्षणिक पात्रता
- पद क्र.१: एमडी / एमएस / डीएम. एम. सीएच / पीएचडी किंवा समतुल्य-१४/१२/११ वर्षे अनुभव
- पद क्र.२: एमडी / एमएस / डीएम. एम.सीएच/ पीएच.डी. किंवा समतुल्य- १०/०८/०७ वर्षे अनुभव
- पद क्र.३: एमडी / एमएस / डीएम. एम.सीएच/ पीएच.डी. किंवा समतुल्य- ०६/०४/०३ वर्षे अनुभव
- पद क्र.४: एमडी / एमएस / डीएम. एम.सीएच/ पीएच.डी. किंवा समतुल्य- ०३ वर्षे अनुभव
वयोमर्यादा
वयाची अट: ४ जानेवारी २०२१ रोजी, (एससी / एसटी: ०५ वर्षे सूट, ओबीसी: ०३ वर्षे सूट)
पद क्र. १ साठी ५८ वर्षांपर्यंत
पद क्र. २ साठी ५८ वर्षांपर्यंत
पद क्र. ३ साठी ५० वर्षांपर्यंत
पद क्र. ४ साठी ५० वर्षांपर्यंत
शुल्क
जनरल आणि ओबीसीसाठी एक हजार रुपये
एससी,एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिलासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही.
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: १९ जानेवारी २०२१
पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहितीसाठी केव्हीआयसीच्या अधिकृत साइट www.aiimskalyani.edu.in वर माहिती मिळू शकेल.