मुक्तपीठ टीम
खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात मानद विशेषज्ञ पदांवर डर्मेटोलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन, सायकॅट्रीस्ट, पेडीयाट्रीसीयन, जनरल सर्जन, डेंटीस्ट अशा विविध पदांसाठी एकूण ०६ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १४ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- डीएनबी/ एमडी
- पद क्र.२- डीएनबी/ एमएस
- पद क्र.३- डीएनबी/ एमडी
- पद क्र.४- डीएनबी/ एमडी
- पद क्र.५- डीएनबी/ एमएस
- पद क्र.६- बीडीएस/ एमडीएस असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही आहे.
शुल्क
ही भरती मुलाखत पद्धतीने होणार असल्याने या पदांसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
मुलाखतीचे ठिकाण
छावणी मंडळ कार्यालय, खडकी, पुणे- ४११००३
अधिक माहितीसाठी खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट https://kirkee.cantt.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.