मुक्तपीठ टीम
नवोदय विद्यालय समितीमध्ये असिस्टंट कमिशनर (ग्रुप-ए), असिस्टंट कमिशनर अॅडमिन (ग्रुप-ए), स्टाफ नर्स (ग्रुप-बी), असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ग्रुप-सी), ऑडिट असिस्टंट (ग्रुप-सी), ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (ग्रुप-बी), ज्युनियर इंजिनीअर (ग्रुप-सी), स्टेनोग्राफर (ग्रुप-सी), कॉम्प्युटर ऑपरेटर (ग्रुप-सी), कॅटरिंग असिस्टंट (ग्रुप-सी), ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (ग्रुप-सी), इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप-सी), लॅब अटेंडंट (ग्रुप-सी), मेस हेल्पर (ग्रुप-सी), मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप-सी) या पदांसाठी एकूण १ हजार ९२५ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) मानविकी/ विज्ञान/ वाणिज्य या विषयात पदव्युत्तर पदवी २) ५ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) पदवीधर २) ८ वर्षे अनुभव
- पद क्र.३- १) १२वी उत्तीर्ण व नर्सिंग डिप्लोमा किंवा बी.एससी नर्सिंग २) २ वर्षे अनुभव
- पद क्र.४- १) पदवीधर २) कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान
- पद क्र.५- बी.कॉम
- पद क्र.६- १) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी २) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा २ वर्षे अनुभव
- पद क्र.७- १) सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी किंवा डिप्लोमा २) ३ वर्षे अनुभव
- पद क्र.८- १) १२वी उत्तीर्ण २) इंग्रजी, हिंदी टायपिंग
- पद क्र.९- १) पदवीधर २) एक वर्षाच्या कॉम्प्युटर डिप्लोमासह वर्ड-प्रोसेसिंग आणि डेटा एंट्रीमधील कौशल्य
- पद क्र.१०- १०वी उत्तीर्ण +दोन वर्षाचा कॅटरिंग डिप्लोमा किंवा १२वी उत्तीर्ण + कॅटरिंग डिप्लोमा +३ वर्षे अनुभव
- पद क्र.११- १) १२वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग २५ श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह १२वी उत्तीर्ण
- पद क्र.१२- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय (इलेक्ट्रिशियन/ वायरमन/ प्लंबर) ३) २ वर्षे अनुभव
- पद क्र.१३- १०वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/ प्रमाणपत्र किंवा १२वी विज्ञान क्षेत्रात उत्तीर्ण
- पद क्र.१४- १) १०वी उत्तीर्ण २) १० वर्षे अनुभव
- पद क्र.१५- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ आणि २ साठी ४५ वर्षांपर्यंत, पद क्र.३,६,७ आणि १० साठी ३५ वर्षांपर्यंत, पद क्र.४,५,९, १३, १४ आणि १५ साठी १८ ते ३० वर्षे, पद क्र.८ आणि ११ साठी १८ ते २७ वर्षे, पद क्र.१२ साठी १८ ते ४० वर्षे अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे असणे आवश्यक आहे.
शुल्क
पद क्र.१ आणि २ साठी जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १ हजार ५०० रूपये, पद क्र.३- जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १ हजार २०० रूपये, पद क्र.४ ते १२- जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून हजार रूपये, पद क्र.१३,१४ आणि १५- जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाणार.
अधिक माहितीसाठी नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत वेबसाइट https://navodaya.gov.in/nvs/en/Home1 वरून माहिती मिळवू शकता.