मुक्तपीठ टीम
ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय विभागात वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस या पदावर १४० जागा, महिलांसाठी अधिपरीचारिका या पदावर १२६ जागा, पुरूषांसाठी अधिपरीचारिका या पदावर १४ जागा, एमपीडब्ल्यू या पदासाठी १४० जागा अशा एकूण ४२० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण ठाणे आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- एमबीबीएस
- पद क्र.२ आणि ३ या पदासाठी- जीएनएम/ बीएससी नर्सिंग
- पद क्र.४- १) विज्ञान विषायात १२वी उत्तीर्ण २) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स केलेला असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ७० वर्षांपर्यंत तर, पद क्र. २ ते ४ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, मागासवर्गीय उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अर्ज पोहचवण्याचे ठिकाण
जिल्हा आरोग्य अधिकारी, कार्यालय, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे
https://arogya.maharashtra.gov.in/ अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइट वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडिओ: