मुक्तपीठ टीम
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी नोकरीची संधी आहे. भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीच्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये असोसिएट पदावर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ७ जून आहे.
शैक्षणिक पात्रता
सोशल वर्क किंवा रूरल मॅनेजमेंटमध्ये शिक्षण झालेले अर्ज करु शकतात. त्यांना संबंधित अभ्यासक्रमामध्ये ५५ टक्के गुण मिळालेले असावेत. सोशल वर्क आणि रूरल मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स डिग्री असणारे उमदेवार अर्ज करु शकतात.
वयोमर्यादा
१ जानेवारी २०२१ रोजी वय २३ ते ३० वर्ष यादरम्यानं असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
निवड प्रक्रिया
- असोसिएट पदावरील नियुक्तीसाठी उमदेवारांची ऑनलाईन टेस्ट घेतली जाईल.
- त्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर करुन मुलाखत घेतली जाईल.
- यानंतर उमदेवारांची निवड केली जाईल.
वार्षिक पगार
- एलआयसी हाऊसिंग द्वारे असोसिएट पदावर भरती सुरु आहे.
- याअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक पगार ६ ते ९ लाख रुपयांपर्यंत दिला जाणरा आहे.
अधिक माहितीसाठी
एलआयसीच्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेड च्या अधिकृत वेबसाइट lichousing.comवरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: