मुक्तपीठ टीम
आयआरईएलमध्ये म्हणजेच इंडिया लिमिटेडमध्ये पदवीधर ट्रेनी (फायनान्स) या पदासाठी ७ जागा, पदवीधर ट्रेनी (एचआर) या पदासाठी ६ जागा, डिप्लोमा ट्रेनी टेक्निकल (माइनिंग/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल) या पदासाठी १८ जागा, ज्युनियर सुपरवाइजर (राजभाषा) या पदासाठी १ जागा, पर्सनल सेक्रेटरी या पदासाठी २ जागा, ट्रेड्समन ट्रेनी (आयटीआय) फिटर/इलेक्ट्रिशियन/ अटेंडंट ऑपरेटर या पदासाठी २० जागा अशा एकूण ५४ जागांसाठी ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- सीए इंटरमीडिएट/ सीएमए इंटरमीडिएट किंवा ६०% गुणांसह बी.कॉम
२) पद क्र.२- ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
३) पद क्र.३- ६०% गुणांसह माइनिंग/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल डिप्लोमा
४) पद क्र.४- १) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी २) १ वर्ष अनुभव
५) पद क्र.५- १) इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी २) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. ३) एमएस ऑफिस ४) १ वर्ष अनुभव
६) पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण+आयटीआय/ एनएसी (फिटर/इलेक्ट्रिशियन/अटेंडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट) किंवा ५०% गुणांसह १२वी (केमिस्ट्री) उत्तीर्ण २) २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३५ वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ४०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी आयआरईएलच्या अधिकृत वेबसाइट https://www.irel.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.