मुक्तपीठ टीम
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये इकोनॉमिस्ट, इनकम टॅक्स ऑफिसर, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी स्केल ५, डाटा सायंटिस्ट, क्रेडिट ऑफिसर, डाटा इंजिनीअर, आयटी सिक्योरिटी एनालिस्ट, आयटी एसओएस एनालिस्ट, रिस्क मॅनेजर स्केल ३, टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट), फायनांशियल एनालिस्ट, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी स्केल २, लॉ ऑफिसर, रिस्क मॅनेजर स्केल २, सिक्योरिटी स्केल २, सिक्योरिटी स्केल १, या पदांसाठी एकूण ११५ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) पीएचडी (इकोनॉमिक्स/ बँकिंग/ कॉमर्स/ इकोनॉमिक पॉलिसी/ पब्लिक पॉलिसी) २) ५ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) सीए २) १० वर्षे अनुभव
- पद क्र.३- १) कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग पदव्युत्तर पदवी/ पदवी किंवा एमसीए किंवा डाटा एनालिस्ट/ एआय अॅंड एमएल/ डिजिटल/ इंटरनेट टेक्नोलॉजीस पदव्युत्तर पदवी/ पदवी २) १० ते १२ वर्षे अनुभव
- पद क्र.४- १) सांख्यिकी/ अर्थमिती/ गणित/ वित्त/ अर्थशास्त्र/ संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) किंवा बी.ई./ बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी) २) ८ ते १० वर्षे अनुभव
- पद क्र.५- १) सीए/ सीएफए/ एसीएमए + ३ वर्षे अनुभव किंवा एमबीए (फायनान्स) + ४ वर्षे अनुभव
- पद क्र.६- १) सांख्यिकी/ अर्थमिती/ गणित/ वित्त/ अर्थशास्त्र/ संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) किंवा बी.ई./ बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी) २) ५ वर्षे अनुभव
- पद क्र.७- १) कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ ईसीई इंजिनीअरिंग पदवी किंवा एमसीए/ एम.एससी. (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी) २) ६ वर्षे अनुभव
- पद क्र.८- १) कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ ईसीई इंजिनीअरिंग पदवी किंवा एमसीए/ एम.एससी. (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी) २) ६ वर्षे अनुभव
- पद क्र.९- १) एमबीए (फायनान्स/ बँकिंग)/ पीजी डिप्लोमा (फायनान्स/ बँकिंग)/ स्टॅटिस्टिक्समधील (सांख्यिकी) पदव्युत्तर पदवी २) ३ वर्षे अनुभव
- पद क्र.१०- १) सिव्हिल/ मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ मेटलर्जी/ टेक्सटाईल/ केमिकल इंजिनीअरिंग पदवी २) ३ वर्षे अनुभव
- पद क्र.११- सीए किंवा एमबीए (फायनान्स) + ३ वर्षे अनुभव
- पद क्र.१२- १) कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलीकम्युनिकेशन्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन पदव्युत्तर पदवी/ पदवी २) २ वर्षे अनुभव
- पद क्र.१३- १) एलएलबी पदवी २) ३ वर्षे अनुभव
- पद क्र.१४- १) एमबीए/ सांख्यिकी/ गणित पदव्युत्तर पदवी किंवा ६०% गुणांसह बॅंकिंग अॅंड फायनान्स पीजी डिप्लोमा २) २ वर्षे अनुभव
- पद क्र.१५- १) पदवीधर २) भारतीय लष्करातील कॅप्टन किंवा त्याहून अधिक दर्जाचे माजी कमिशन अधिकारी किमान ५ वर्षे सेवा किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष दर्जाचे अधिकारी
- पद क्र.१६- १) पदवीधर २) भारतीय सैन्यात जीएसओ म्हणून किमान ५ वर्षांच्या सेवेसह किंवा हवाई दल, नौदल आणि पॅरा मिलिटरी फोर्सेसमधून समकक्ष रँक असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे २० ते ५० वर्ष या दरम्यान असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ८५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी उमेदवारांकडून १७५ रूपये शुल्क आकारले जाणार.
अधिक माहितीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://centralbankofindia.co.in/en वरून माहिती मिळवू शकता.