Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘वेला’ पाणबुडी म्हणजे कारवाया फत्ते करणारं शक्तिशाली माध्यम : नौदल प्रमुख

November 26, 2021
in चांगल्या बातम्या, सरकारी बातम्या
0
file foto of chief of naval staff karambir sing...he will be retired on 29th november 2021

मुक्तपीठ टीम

भारताच्या नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस वेला’ या पाणबुडीचा समावेश झाला आहे. ती पराक्रम दाखवेल. या पाणबुडीमध्ये आरमारी कारवायांचा (ऑपरेशन्स) संपूर्ण स्पेक्ट्रम हाती घेण्याची क्षमता आहे. ही पाणबुडी ‘शक्तिशाली माध्यम’ आहे, असेही नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

INS Vela (1)

आजची गतिमान आणि गुंतागुंतीची सुरक्षा परिस्थिती पाहता, ‘वेला’ची क्षमता आणि शक्ती हिंदी महासागर क्षेत्राच्या सीमा ओलांडून भारताच्या सागरी हिताचे संरक्षण, प्रचार आणि जतन करण्याच्या नौदलाच्या क्षमतेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि आमच्या शत्रूंना ‘स्पष्ट प्रतिबंधक’म्हणून काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

चीनी नौदलावर बारकाईनं लक्ष!

हिंदी महासागर क्षेत्रातील चिनी नौदलाच्या कारवायांसंबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात, अ‍ॅडमिरल सिंग म्हणाले की, ते सन २००८ पासून एडनच्या आखातामध्ये चाचेगिरी विरोधी गस्तीसाठी कार्यरत आहेत. त्यांच्या पाणबुड्या नियमित अंतराने भारतीय सागरी क्षेत्रात (आयओआर) आल्या आहेत. आत्तापर्यंत, बहुतेक चीनच्या संशोधन नौका आणि त्यांची सर्वेक्षण जहाजे यावर केंद्रीत आहेत. आम्ही त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असेही नौदल प्रमुख म्हणाले.

अमेरिकेकडून भाडेतत्वावर घेतलेल्या सी गार्डियन ड्रोनसह ‘पी ८ आय’ ही सागरी पाणबुडीविरोधी गस्ती विमाने भारतासाठी खरी शक्तिगुणक ठरली आहेत, असेही त्यांनी सांगितले. पी ८ आय आणि सी गार्डिअन्स ड्रोन्स हिंदी महासागर प्रदेशात अतिशय बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कारण त्यांची पोहोच आणि दीर्घकाळापर्यंत एखाद्या क्षेत्रात टिकून राहण्याची क्षमता आहे, असे अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांनी सांगितले.

निवृत्तीपूर्वी दोन शक्तीकेंद्रांच्या समावेशाचा बहुमान

INS Vishakhapattanam - INS Vela

  • करमबीर सिंग २९ नोव्हेंबरला होणार निवृत्त
  • करमबिर सिंग येत्या २९ नोव्हेंबरला सेवानिवृत्त होणार आहेत.
  • निवृत्तीआधी ‘आयएनएस विशाखापट्टणम्’ ही अत्याधुनिक विनाशिका आणि ‘आयएनएस वेला’ ही अत्याधुनिक पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात कमिशन्ड करण्याचा बहुमान मिळाला आहे.
  • ही पाणबुडी आकाराने जगातील सर्वाधिक लहान, तरीही हल्ला करु शकणारी आहे.
  • तिचा वेग ताशी कमाल २० ते २२ सागरी मैल आहे.

 

लिंक क्लिक करा आणि वाचा: ‘आयएनएस वेला’ पाणबुडीवरील १८ पाणतीरांच्या सुसज्जतेमुळे शत्रूंच्या छातीत धडकी!

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: Indian NavyINS velaMazgaon DockNavyआयएनएस वेलानौदलभारतीय नौदलमाझगाव डॉक
Previous Post

‘आयएनएस वेला’ पाणबुडीवरील १८ पाणतीरांच्या सुसज्जतेमुळे शत्रूंच्या छातीत धडकी!

Next Post

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ११५ जागांवर नोकरीची संधी

Next Post
Central Bank of India

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ११५ जागांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!