Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट…भारतातही अलर्ट! परदेशातून येणाऱ्यांवर कडक लक्ष!!

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
new variant of corona found in south africa

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात कोरोना मंदवला असतानाच संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारी बातमी आली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. यामुळे पुन्हा एकदा तज्ज्ञांनी भीती व्यक्त केली आहे. भारत सरकार यामुळे अलर्ट झाले असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात पत्र लिहून सावध केले आहे. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना येथून येणार्‍या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना चाचाणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना चाचाणी

  • केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहिले आहे.
  • या पत्रानुसार, दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना येथून येणार्‍या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

संक्रमित प्रवाशांच्या नमुन्यांची जीनोम चाचणी करावी

  • राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना संक्रमित आढळलेल्या प्रवाशांचे नमुने ताबडतोब नियुक्त जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळांमध्ये पाठवले जातील याची खात्री करण्यास सांगितले.
  • नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) च्या हवाल्याने पत्रात म्हटले आहे की, बोत्सवाना, दक्षिण आफ्रिका आणि हाँगकाँगमध्ये कोरोनाचे नवीन B.1.1529 प्रकार आढळून आले आहेत.

 

प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या लोकांवर लक्ष ठेवा

  • भूषण यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या या प्रकारात मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तन झाले आहे.
  • अलीकडेच व्हिसा निर्बंध शिथिल केल्यामुळे देशाच्या सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करणे आवश्यक आहे.
  • एवढेच नाही तर या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या लोकांवरही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लक्ष ठेवले पाहिजे.

 

आयजीएसएलएसकडे नमुने त्वरित पाठवा!

  • सरकारने राज्यांना संक्रमित प्रवाशांचे नमुने त्वरित आयजीएसएलएसकडे पाठवण्यास सांगितले आहे.
  • जीनोमिक चाचणी अहवाल लवकर यावेत याची खात्री करण्यासाठी, राज्याने संबंधित आयजीएसएलएससोबत पाळत ठेवणार्‍या
  • अधिकार्‍यांमार्फत समन्वय साधावा जेणेकरुन प्रकार आढळून आल्यानंतर आवश्यक आरोग्यविषयक उपाययोजना करता येतील.

 

परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करा

  • दक्षिण आफ्रिकेच्या शास्त्रज्ञांना कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार सापडला असल्याची माहिती आहे.
  • नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेस (NICD) ने गुरुवारी सांगितले की दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या या नवीन कोरोना प्रकाराचे संभाव्य परिणाम समजून घेण्यासाठी वैज्ञानिक काम करत आहेत.
  • एनआयसीडीने सांगितले की जीनोमिक सिक्वेन्सिंगनंतर बी 1.1.529 प्रकारातील २२ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

Tags: coronacorona new variantIndian GovtSouth Africaकोरोनाकोरोना चाचाणीदक्षिण आफ्रिकानवा व्हेरिएंटभारत सरकार
Previous Post

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ११५ जागांवर नोकरीची संधी

Next Post

उपचार न केलेल्या एचआयव्ही-एड्स रुग्णांपासून कोरोनाचा नवा व्हेरिएंट विकसित झाल्याची शक्यता! ब्रिटनने सहा देशांची विमानं रोखली!

Next Post
corona

उपचार न केलेल्या एचआयव्ही-एड्स रुग्णांपासून कोरोनाचा नवा व्हेरिएंट विकसित झाल्याची शक्यता! ब्रिटनने सहा देशांची विमानं रोखली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!