मुक्तपीठ टीम
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल म्हणजेच सीएपीएफमध्ये सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) या पदासाठी ५ जागा, स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) या पदासाठी २०१ जागा, मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) या पदासाठी ३४५ जागा, डेंटल सर्जन या पदासाठी २ जागा या पदांसाठी एकूण ५५३ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार १) पद क्र.१- १) एमबीबीएस २) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा ३) डी.एम./ एम.सीएच.+ ३ वर्षे अनुभव
२) पद क्र.२- १) एमबीबीएस २) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा ३) २.५ वर्षे अनुभव
३) पद क्र.३- १) औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता
४) पद क्र.४- ६०% गुणांसह डेंटल सर्जन (बीडीएस) पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५० वर्षांर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ४०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, इतर कोणत्याही उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
सीएपीएफच्या अधिकृत वेबसाइट https://www.mha.gov.in/about-us/central-armed-police-forces वरून माहिती मिळवू शकता.