Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किरीट सोमय्यांची नवी हिट लिस्ट…”उद्धव ठाकरे इलेव्हनचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार, आव्हाड बॅग भरा!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
BJP-MVA

मुक्तपीठ टीम

भाजपा नेते किरीट सोमय्यांनी आता त्यांची नवी हिट लिस्ट जारी केली आहे. ठाकरे सरकारवर त्यांनी हल्ला वाढवत लूट आणि बेनामी कारभाराचा आरोप केला आहे. ठाकरे सरकार हे बेनामी सरकार आहे. ठाकरे मंत्रिमंडळाचा त्यांनी ठाकरे इलेव्हन सरकार असा उल्लेख केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह बाराजणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार, असा इशारा त्यांनी दिला आहे. परिवहन मंत्री अनिल परब, खासदार भावना गवळी ही सध्या ईडीच्या फेऱ्यातील नावे घेताना त्यांनी नवे नाव घेतले ते राज्याचे गृहनिर्माण मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांचं. “आव्हाड तुम्हाला जाहीर आव्हान आहे, तुम्हीही बॅग भरा”, असा इशारा माजी खासदार सोमय्या यांनी दिला आहे.

 

सोमवारी भाजपा नेते किरीट सोमय्या हे सांगलीत होते. त्यांनी आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या सांगली आणि तासगावमधील मालमत्तांची पाहणी केली. त्यावेळी परिवहन मंत्री अनिल परब यांची बेनामी संपत्ती खरमाटे यांच्या नावावर असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केलाय. आरटीओ अधिकारी खरमाटे हे अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात.

७० हजार पगार, मग ७५० कोटींची मालमत्ता कशी?

  • किरीट सोमय्या यांनी आरटीओ अधिकारी खरमाटे आणि त्यांच्या निमित्तानं परिवहन मंत्री अनिल परबांवर गंभीर आरोप केले.
  • बजरंग खरमाटे यांची तब्बल ७५० कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
  • त्यांचा पगार ७० हजार आहे. मग त्यांच्याकडे एवढी मालमत्ता कशी आली?
  • खरमाटे यांची सोने-चांदीची दुकानं, प्रथमेश पाईप कारखाना आहे.
  • खरमाटे यांच्या प्रथमेश या मुलाच्या नावानं अनेक उद्योग आहेत.
  • ही संपत्ती कुणाची आहे कळत नाही.
  • अनिल परब यांच्या सचिवाची एवढी मालमत्ता कशी?
  • मग मंत्रिमहोदयांची किती असेल?

“उद्धव ठाकरे इलेव्हनचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार, आव्हाड बॅग भरा!”

  • सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले.
  • त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर १९ बेनामी बंगले आहेत.
  • ठाकरे सरकार हे बेनामी सरकार आहे.

 

ठाकरे इलेव्हन सरकार आणि उद्धव ठाकरेंसह बाराजणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार!

  • आम्ही ठाकरे यांच्या धमक्यांना घाबरत नाही.
  • आम्ही घोटाळे केले असतील तर चौकशी करा.
  • आता अनिल परब प्रकरण आता सुरु आहे.
  • भावना गवळी पुढच्या आठवड्यात असणार.
  • जितेंद्र आव्हाड तुम्हाला जाहीर आव्हान आहे, तुम्हीही बॅग भरा! असा इशाराही सोमय्यांनी दिला.

बजरंग खरमाटे यांच्यावर आरोप काय?

  • बजरंग खरमाटे हे आरटीओ अधिकारी आहेत.
  • सोमवारी खरमाटेंची ईडीकडून चौकशी करण्यात आली.
  • खरमाटे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप आहे.
  • खरमाटे, त्यांची पत्नी, मुलगा आणि भाऊ यांच्याकडे असलेल्या मालमत्तांबाबतही ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली.
  • मालमत्ता कशी मिळवली, मालमत्ता किती रुपयांना घेतली, पैसे कुठून आले, याबाबत चौकशी करण्यात आली.
  • सरकारी बदल्यांमध्ये होत होत्या त्यात खरमाटे यांची काय भूमिका होती? याबाबतीतही चौकशी करण्यात आली.

Tags: BJPchief minister uddhav thackerayHousing Minister Jitendra Awhadकिरीट सोमय्याजितेंद्र आव्हाडपरिवहन मंत्री अनिल परबभाजपा
Previous Post

सीएपीएफमध्ये वैद्यकीय विभागात डॉक्टरांसाठी ५५३ जागांवर संधी

Next Post

“अंकनाद स्पर्धेतून मुलांच्या प्रतिभेला वाव”: सुभाष देसाई

Next Post
Subhash Desai

"अंकनाद स्पर्धेतून मुलांच्या प्रतिभेला वाव": सुभाष देसाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!