मुक्तपीठ टीम
सरकारी नवरत्न उद्योगांपैकी एक असणाऱ्या एनबीसीसी इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी आहे. कनिष्ठ अभियंता आणि उपमहाव्यवस्थापक पदांच्या ८१ जागामसाठी भरती आहे.
या भरतीसाठी कंपनीच्या वेबसाइट वर अधिसूचना जारी केली जाईल. अहवालानुसार, या पदांसाठी अर्ज करण्याची मुदत १४ एप्रिल २०२२ पर्यंत आहे.
उपलब्ध जागांची माहिती
या भरतीअंतर्गत एकूण ८१ पदे भरण्यात येणार आहेत.
- ६० पदे कनिष्ठ अभियंता स्थापत्यची आहेत.
- २० पदे कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकलची आहेत.
- १ पद उपमहाव्यवस्थापकांचे आहे.
वयोमर्यादा
कनिष्ठ अभियंता पदांसाठी २३ वर्षांपर्यंतचे उमेदवार उपमहाव्यवस्थापक पदांसाठी ४० वर्षे वयाचे उमेदवार अर्ज करू शकतात.
पगार
- कनिष्ठ अभियंता पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ₹ २७ हजार २७० वेतन दिले जाईल.
- तर उपमहाव्यवस्थापक पदांसाठी ते दरमहा ७० हजार ते २ लाखांपर्यंत असेल.
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी एनबीसीसी इंडिया लिमिटेडच्या www.nbccindia.com या वेबसाइटला भेट द्यावी. वेबसाइटच्या करिअर विभागात भेट देऊन अर्ज भरावा लागेल. https://www.nbccindia.com/webEnglish/jobs