मुक्तपीठ टीम
इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) मध्ये सब-इन्स्पेक्टरच्या विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. सब-इन्स्पेक्टरच्या एकूण ३७ जागांसाठी नोकरीची संधी आहे. या भरतीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी ३२ पदे तर महिला उमेदवारांसाठी ५ पदे आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार,१४ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण, तर सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा झालेला असावा.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
निवड प्रक्रिया
- लेखी चाचणी,
- पीईटी आणि पीएसटीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.
- लेखी परीक्षेनंतर अर्जदारांना पीईटी आणि पीएसटीसाठी बोलावले जाईल.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP)च्या अधिकृत वेबसाइट https://recruitment.itbpolice.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.