मुक्तपीठ टीम
भारतीय रिझर्व्ह बँकेत ऑफिसर ग्रेड ‘बी’(डीआर)- जनरल या पदासाठी २३८ जागा, ऑफिसर ग्रेड ‘बी’(डीआर)- डीईपीआर या पदासाठी ३१ जागा, ऑफिसर ग्रेड ‘बी’(डीआर)- डीएसआयएम या पदासाठी २५ जागा अशा एकूण २९४ जागांवर नोकरीची संधी आहे. ही भरती संपूर्ण भारतात केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १८ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) ६०% गुणांसह पदवीधर किंवा ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी
- पद क्र.२- अर्थशास्त्र/ गणित अर्थशास्त्र/ एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम/ वित्त या विषयात ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा ५५% गुणांसह पीजीडीएम/ एमबीए (फायनान्स) किंवा ५५% गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उप-वर्गात अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच कृषी/ व्यवसाय/ विकास
- पद क्र.३- आयआयटी-खरगपूरमधून सांख्यिकी / गणित सांख्यिकी/ गणित अर्थशास्त्र/ इकोनोमेट्रिक्स/ सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी/ आयआयटी-बॉम्बेमधून अप्लाइड सांख्यिकी अॅंड इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी किंवा ५५% गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी आणि एक वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा किंवा आयआयटी कोलकाता, आयआयटी खरगपूर आणि आयआयएम कोलकाता ५५% गुणांसह बिझिनेस अॅनलिटिक्स पदव्युत्तर डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ८५० रूपये शुल्क आकारले जाणार तर एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.rbi.org.in/ वरून माहिती मिळवू शकता.