Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

क्षयरोग रुग्णांमध्ये लक्षणीय घटीसाठी महाराष्ट्राला एक सुवर्ण तर दोन कांस्यपदक

September 6, 2026
in आरोग्य, चांगल्या बातम्या
0
tb

मुक्तपीठ टीम

क्षयरोग रुग्णांमध्ये लक्षणीय घट घडवून आणणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सुवर्ण पदक तर अकोला आणि बीड जिल्हयांना आज येथे कांस्यपदक प्रदान करण्यात आले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आयोजित “स्टेप अप टू एन्ड टीबी २०२२” शिखर परिषदेत क्षयरोग रुग्णांमध्ये लक्षणीय घट घडवून आणणाऱ्या राज्य व जिल्ह्यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी जिल्हा श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना सन्मानित करण्यात आले. वर्ष २०१५ च्या तुलनेत वर्ष २०२१ पर्यंत क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये ६० टक्के पेक्षा जास्त घट घडवून आणणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याला यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया,राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.अहमदनगर जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत दहीफळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पदक, ५ लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

या शिखर परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जिल्हा श्रेणींच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.अकोला आणि बीड जिल्ह्यांना वर्ष २०१५ च्या तुलनेत वर्ष २०२१ पर्यंत क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये २० टक्के पेक्षा जास्त घट घडवून आणण्याच्या कामगिरीसाठी यावेळी कांस्यपदकाने गौरविण्यात आले. अकोल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हरी पवार आणि बीड जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पदक, २ लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे तर केंद्रीयमंत्री डॉ. मनसुख मांडविया,डॉ. भारती पवार यांच्यासह विज्ञान-तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनी विज्ञानभवनात उपस्थितांना संबोधित केले.


Tags: Ahmednagar Districtakolabeedbronze medalGold Medalgood newsMaharashtramuktpeethTuberculosis PatientUnion Ministry of Health and Family Welfareअकोलाअहमदनगर जिल्हाकांस्यपदककेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणक्षयरोग रुग्णचांगली बातमीबीडमहाराष्ट्रमुक्तपीठसुवर्णपदक
Previous Post

निराधार व्यक्तींना निवृत्तीवेतन योजनेचा लाभ; उत्पन्न मर्यादा वाढविण्यावर सरकार विचार करणार!

Next Post

भारतीय रिझर्व्ह बँकेत २९४ जागांवर नोकरीची संधी

Next Post
rbi

भारतीय रिझर्व्ह बँकेत २९४ जागांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!