मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत कार्यकारी संचालक (ऑपरेशन्स), कार्यकारी संचालक (प्रोजेक्ट्स), मुख्य महाव्यवस्थापक (आयटी), मुख्य महाव्यवस्थापक (सिक्योरिटी अॅंड एनफोर्समेंट), उपमहाव्यवस्थापक (आयटी), मुख्य अभियंता (ट्रान्सको), अधीक्षक अभियंता (ट्रान्सको), अधीक्षक अभियंता (स्थापत्य) या पदांवर एकूण २१ जागांवर नोकरीची संधी आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १९ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी २) १५ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी २) १५ वर्षे अनुभव
- पद क्र.३- १) कॉम्प्युटर/ आयटी/ कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग पदवी किंवा कॉम्प्युटर अॅप्लिकेशन/ कॉम्प्युटर मॅनेजमेंट/ सिस्टिम मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी २) १५ वर्षे अनुभव
- पद क्र.४- १) पदवीधर २) लेफ्टनंट कर्नल किंवा समतुल्य पद धारण केलेले लष्कर, नौदल किंवा हवाई दलातील सेवारत किंवा माजी लष्करी अधिकारी असणे आवश्यक आहे.
- पद क्र.५- १) बी.ई (कॉम्प्युटर/ आयटी/ कॉम्प्युटर सायन्स) किंवा बी.टेक. (कॉम्प्युटर/ आयटी) किंवा एमबीए किंवा एमसीए २) १२ वर्षे अनुभव
- पद क्र.६- १) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी २) १५ वर्षे अनुभव
- पद क्र.७- १) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी २) १५ वर्षे अनुभव
- पद क्र.८- १) सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी २) १५ वर्षे अनुभव उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जास्तीत जास्त ५९ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुला प्रवर्गातील उमेदवारांकडून ८०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, मागासवर्गीय वर्गातील उमेदवारांकडून ४०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट क्रमांक, सी-१९, सातवा मजला, एचआर विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू), मुंबई- ४०००५१
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या अधिकृत वेबसाइट https://www.mahatransco.in/ वरून माहिती मिळवू शकता.