मुक्तपीठ टीम
भाभा अणु संशोधन केंद्रात स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-१, स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-२, सायंटिफिक असिस्टंट/ बी (सेफ्टी), टेक्निशियन/ बी (लायब्ररी सायन्स), टेक्निशियन/ बी (रिगर) या पदांसाठी अशा एकूण २६६ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण तारापूर आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१ साठी ६०% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ केमिकल/ सिव्हिल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/ इन्स्ट्रुमेंटेशन अॅंड कंट्रोल इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा ६०% गुणांसह बी.एससी (केमिस्ट्री)
- पद क्र.२ साठी ६०% गुणांसह १०वी उत्तीर्ण + आयटीआय (एसी मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ फिटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ मशिनिस्ट/ टर्नर/ वेल्डर/ लॅब असिस्टंट) किंवा ६०% गुणांसह १२वी पीसीएम उत्तीर्ण
- पद क्र.३ साठी- १) ६०% गुणांसह कोणताही इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा ६०% गुणांसह बी.एससी २) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/ प्रमाणपत्र
- पद क्र.४ साठी- १) ६०% गुणांसह १०वी उत्तीर्ण/ १२वी पीसीएम उत्तीर्ण २) लायब्रेरी सायन्स प्रमाणपत्र
- पद क्र.५ साठी- १) ६०% गुणांसह १०वी उत्तीर्ण/ १२वी पीसीएम उत्तीर्ण २) रिगर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जास्तीत जास्त १८ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
पद क्र. १ आणि ३ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, पद क्र. २, ४ आणि ५ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे. एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भाभा अणु संशोधन केंद्राच्या अधिकृत वेबसाइट http://www.barc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.