Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“बालहक्क संरक्षण आयोगावर अध्यक्ष व सदस्यांची ६ आठवड्यात नियुक्ती करा!”

उच्च न्यायालयाचे महाराष्ट्र सरकारला आदेश

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Mantralay And mumbai high court

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्षपद व सदस्यांची पदे २ वर्षांपासून रिकामी आहेत. वारंवार तक्रारी येवूनही राज्यातील आघाडी सरकारने काहीच केलेले नाही. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाच्या नितीन दळवी व प्रसाद तुळसकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने बालहक्क संरक्षण आयोगावर अध्यक्ष व सदस्यांची ६ आठवड्यात नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

 

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्षपद व सदस्यांची पदे २ वर्षांपासून रिकामी असल्याने बालकांच्या तक्रारींची सुनावणी होत नव्हती. त्यामुळे बऱ्याच तक्रारी प्रलंबित असल्याने महाराष्ट्रातील तक्रारदार व बालकं न्यायापासून वंचित असल्याचे महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाच्या नितीन दळवी व प्रसाद तुळसकर यांच्या निदर्शनास आले होते.

 

 

नितीन दळवी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महिला व बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर यांना आयोगावर अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत पत्र लिहिले होते. त्याची दखल घेऊन सरकारने एकात्मिक बाल विकास योजनेच्या आयुक्तांना बालहक्क आयोगाच्या अध्यक्षपदाचा अधिभार डिसेंबर २०२१ मध्ये दिला. पण सदस्यांची निवड केली नाही. हे सर्व तात्पुरत्या स्वरूपाचे असल्यामुळे महासंघाचे नितीन दळवी व प्रसाद तुळसकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली, त्याची सोमवारी सुनावणी करताना उच्च न्यायालयाने महिला व बाल विकास विभागाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार
६ आठवड्यात आयोगावर अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक करायचे निर्देश दिले. तसेच सर्व नियुक्ती पत्रांसहित २ जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

 

याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडण्याचे काम वकील रोनिता भट्टाचार्य करत आहेत.


Tags: high courtMaharashtraNitin DalviUddhav ThackerayYashomati Thakurउच्च न्यायालयउद्धव ठाकरेनितीन दळवीमहाराष्ट्रमहिला व बाल विकास विभागयशोमती ठाकूर
Previous Post

भाभा अणु संशोधन केंद्रात स्टायपेंडरी ट्रेनी, सायंटिफिक असिस्टंटच्या २६६ जागांवर भरती

Next Post

वाघांचं सहजच दर्शन…चला टिपेश्वरला!

Next Post
वाघांचं सहजच दर्शन…चला टिपेश्वरला!

वाघांचं सहजच दर्शन...चला टिपेश्वरला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!