मुक्तपीठ टीम
कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये सेमी स्किल्ड रिगर या पदासाठी ५३ जागा, स्कॅफफोल्डर या पदासाठी ०५ जागा, सेफ्टी असिस्टंट या पदासाठी १८ जागा, फायरमन या पदासाठी २९ जागा, कुक सीएसएल गेस्ट हाऊस या पदासाठी ०१ जागा अशा एकूण १०६ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०८ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) ०४थी उत्तीर्ण २) ०३ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १०वी उत्तीर्ण + आयटीआय शीट मेटल वर्कर/ प्लंबर + ०१ किंवा ०२ वर्षे अनुभव किंवा १०वी उत्तीर्ण + ०३ वर्षे अनुभव
- पद क्र.३- १) १०वी उत्तीर्ण २) सेफ्टी/ फायर डिप्लोमा २) ०१ वर्ष अनुभव
- पद क्र.४- १) १०वी उत्तीर्ण २) अग्निशमन प्रशिक्षण ३) ०१ वर्ष अनुभव
- पद क्र.५- १) ०७वी उत्तीर्ण २) ०५ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० वर्षांपर्यंत तर पद क्र.२ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ५३ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://cochinshipyard.in/ वरून माहिती मिळवू शकता.