Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मध्य रेल्वेच्या किसान रेल्वेगाडीची हजारावी फेरी रवाना! ४५३ टन केळ्यांची वाहतूक!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Kisan Railway

मुक्तपीठ टीम

शेतीमाल वाहतुकीसाठीचा किसान रेल्वेचा उपक्रम चांगलाच यशस्वी ठरला आहे. नुकतीच मध्य रेल्वेच्या किसान रेल्वेगाडीची हजारावी फेरी झाली. महाराष्ट्रातील सावदा येथून निघून दिल्लीतील आदर्श नगर येथे ही हजारावी गाडी गेली. या गाडीला २३ डबे असून त्यात ४५३ टन केळ्यांची वाहतूक झाली आहे. कोरोना संकटात सुरु झालेला हा उपक्रम देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला आहे. आता शेतीमाल आणि शेतीमालाची बाजारपेठ यातील अंतर रेल्वेमुळे सहज गाठता येणं शक्य झालं आहे.

 

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर, केंद्रीय रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज वेबलिंकच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून याप्रसंगी, उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर म्हणाले की, आपला देश कृषी प्रधान आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. फळे आणि भाज्या यांच्यासारख्या नाशिवंत शेतमालाला उत्तम भाव मिळण्यासाठी किसान गाड्यांच्या माध्यमातून किफायतशीर दरात दूर अंतरावरील बाजारात पोहोचविणे ही त्यापैकीच एक योजना आहे. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी पहिल्या आणि शंभराव्या किसान रेल्वेगाडीला रवाना केले त्या दोन्ही प्रसंगी मी उपस्थित होतो. म्हणूनच आज मध्य रेल्वेच्या हजाराव्या किसान गाडीला रवाना करण्याच्या प्रसंगी उपस्थित राहताना मला अत्यंत आनंद होतो आहे.

 

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच शेतकऱ्याला प्रत्येक उपक्रमाला केंद्रस्थानी ठेवले आहे आणि त्यांच्या भल्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल दूरवरच्या बाजारांमध्ये कमी वेळात आणि किफायतशीर दरात पोहोचविण्यासाठी किसान विशेष गाड्या सुरु करणे हा त्यापैकीच एक उपक्रम आहे. जळगावच्या केळ्यांना जीआय मानांकन मिळाल्याचा त्यांनी अत्यंत अभिमानाने उल्लेख केला. या कामगिरीबद्दल जळगावच्या शेतकऱ्यांचे अभिनंदन करत केंद्रीय मंत्र्यांनी त्यांना अधिक सुधारणेसाठीच्या सूचना सादर करण्याचे आवाहन केले.

 

केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाणकाम राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि खासदार रक्षा खडसे यांनी देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी रेल्वे विभागाने सुरु केलेल्या या उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी, आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार शिरीष चौधरी सावदा रेल्वे स्थानकावर उपस्थित होते.

 

रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्हि.के.त्रिपाठी यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि किसान रेल्वेगाड्या सुरु केल्यापासून आतापर्यंतच्या या गाड्यांच्या परिचालनाविषयी तसेच या गाड्या छोट्या शेतकऱ्यांमध्ये कशा प्रकारे लोकप्रिय होत आहेत त्या विषयी थोडक्यात माहिती दिली. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी मुंबईहून सर्वांचे आभार मानले.

 

कलेच्या क्षेत्रात वावरणारे कलाकार आणि गुणवंत यांची आर्थिक तसेच सामाजिक-अर्थविषयक स्थिती सुधारण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ‘कलाकारांसाठी निवृत्तीवेतन आणि वैद्यकीय मदत’ योजना सुरु केली.


Tags: Banana TransportCentral RailwayElectronics and Information Technology Ashwini Vaishnavgood newskisan railwaymuktpeethUnion Minister for Agriculture and Farmers Welfare Narendra Singh TomarUnion Minister for Railwaysइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानकिसान रेल्वेकेंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमरकेंद्रीय रेल्वेकेळ्यांची वाहतूकमध्य रेल्वे
Previous Post

महाआवास अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात पाच लाख घरे बांधणार! १५ फेब्रुवारीपर्यंत शंभर टक्के घरकुलांना मंजुरी!

Next Post

भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदाची भरती

Next Post
indiancoastguard

भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदाची भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!