Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विचाराला कृतीची जोड देणारी, राष्ट्र सेवा दलाची ” कार्यक्रम आयोजन कार्यशाळा”

December 10, 2021
in घडलं-बिघडलं
0
Rashtra Seva Dal

मक्तपीठ टीम

सामाजिक,राजकीय चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आपापल्या संस्था,संघटना या मार्फत विविध कार्यक्रम सातत्याने करीत असतात. असे कार्यक्रम नीट-नेटके, यशस्वी आणि प्रभावी करण्यासाठी त्या त्या कार्यक्रमाचे डिझाईन करणे गरजेचे असते. हे ‘डिझायन’ कसे करावे? कार्यक्रमाचं सूत्रसंचलन ते आभार कसं असावं? बोलण्यातील भीती कशी घालवावी? प्रभावी भाषण कसं करतात? या सगळ्याचं तंत्र आणि मंत्र कोणता? सोशल मीडियाचा वापर कसा करावा??? याच सर्व प्रश्नांना घेवून मुंबई आणि चिपळूण मधील राष्ट्र सेवा दलातील कार्यकर्त्यांसाठी “कार्यक्रम आयोजन कार्यशाळा” सह्याद्रीच्या कुशीतील ‘प्रयोगभूमीत ‘ आयोजित करण्यात आली होती.

 

राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते आणि जेष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांनी ही कार्यशाळा सलग तीन दिवस घेतली. आपल्या दीर्घ अनुभवातून त्यांनी नव्याने हा सिलॅबस तयार केलाय. सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी अशा प्रकारची ही पहिलीच कार्यशाळा होती. भविष्यात सामाजिक, राजकीय चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी या कार्यशाळेचा प्रभावी उपयोगी होवू शकेल, यात वाद नाही. शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबरच्या रात्री दहा वाजता या शिबिराला सुरुवात झाली आणि रविवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता त्याची सांगता करण्यात आली. कृती-प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शिबिरार्थीनी या सगळ्याचा अनुभव घेतला. सहभागींचा उत्साह ओथंबून जात होता.

 

 

असे कार्यक्रम नीट-नेटके, यशस्वी आणि प्रभावी करण्यासाठी त्या त्या कार्यक्रमाचे डिझाईन करणे गरजेचे असते. हे ‘डिझायन’ कसे करावे? या प्रश्नांवर मुंबई आणि चिपळूण राष्ट्र सेवा दलाने “कार्यक्रम आयोजन कार्यशाळा” सह्याद्रीच्या कुशीतील ‘प्रयोगभूमीत ‘ आयोजित करण्यात आली होती. pic.twitter.com/FGnAIXTV6h

— Rashtra Seva Dal (@RashtraSevaDal1) November 23, 2021

 

या कार्यशाळेतच सकाळी सह्याद्री भ्रमण, कोळकेवाडी धरणातील बॅक वॉटर पाहणी, इथल्या आदिम समाजाचं संगीत, नृत्य, इथली लोकगीते यातही शिबिरार्थी सहभागी झाले. या कार्यशाळेत अधिकतर मुलींचा सहभाग होता. कार्यशाळेमार्फत नवी उत्साही कार्यकर्यांची टीम सेवा दलाला मिळाली. चाकोरीबद्ध शिबिरांपेक्षा वेगळा दृष्टीकोन देणारा, विचारांना चालना देणारा, स्वतःला पडलेले प्रश्न स्वतः सोडवत पुढे जाणारा नवा कार्यकर्ता या निमित्ताने जोडला जाईल हीच या शिबिराची उपलब्धी. राष्ट्र सेवा दल,मुंबईने या अगोदर नाईट आऊट शिबीर, वर्षा सहलीनिमित्त भात लावणी किंवा जंगलवृद्धीकरता वृक्षरोपण उपक्रम केले आहेत. आता ‘कार्यक्रम आयोजन कार्यशाळा’ अशी आगळी कार्यशाळा यशस्वी केली आहे. या कार्यशाळेचे आयोजन राष्ट्र सेवा दल,मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे सेक्रेटरी राजन इंदुलकर आणि प्रयोग भूमीच्या सहकार्याने केले होते.


Tags: Event Organizing Workshopmumbairashtra seva dalकार्यक्रम आयोजन कार्यशाळामुंबईमुंबई राष्ट्र सेवा दलराष्ट्र सेवा दल
Previous Post

सांगली शहरात लसीकरणाचा विक्रम, महालसीकरण मोहिमेत एका दिवसात ११ हजार ८८५ डोस!

Next Post

ऐन उत्तरप्रदेश निवडणुकीपूर्वी संसदेत मथुरा कृष्ण जन्मभूमीचा मुद्दा! ‘जैसे थे’ स्थिती कायदा रद्द करण्याची मागणी!!

Next Post
bjp mla

ऐन उत्तरप्रदेश निवडणुकीपूर्वी संसदेत मथुरा कृष्ण जन्मभूमीचा मुद्दा! 'जैसे थे' स्थिती कायदा रद्द करण्याची मागणी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!