मुक्तपीठ टीम
बंधनं असली तरी कल्पनेला निर्बंध नसतात. त्यामुळे बुद्धीदात्या गणरायाच्या उत्सवात बुद्धीचा सकारात्मक वापर केला तर अनेक चांगले उपक्रम राबवता येतात. गोरेगावमधील राष्ट्र सेवा दल कार्यकर्त्यांच्या बीज मोदकांचा उपक्रम असाच आहे. गणेशोत्सवात पर्यावरणाकडून घेतलेलं त्यालाच परत करण्याचा प्रयत्न करणारा. कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या बिया मिसळून मातेचे बीज मोदक घडवलेत. ते आता कोकणपट्ट्यातील डोंगर-दऱ्यांमध्ये निसर्गाला अर्पण केले जातील.
बीजमोदकांचा पर्यावरणस्नेही उपक्रम
- हे मातीचे विशेष बीजमोदक गोरेगावातील राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी तयार केलेत.
- खत मिश्रित मातीत विविध झाडांच्या बिया घालून असे असंख्य मोदक तयार झालेत.
- कोकणात पूरस्थिती होतीच पण अनेक ठिकाणी भूस्खलन झालं.
- डोंगराला भेगा पडल्यात.
- याठिकाणी या मोदकांचा नैवेद्य वसुंधरेला अर्पण करायला हे तरूण जाणार आहेत.
- पुन्हा नवे अंकूर फुलवणं हे कोणत्याही पुजेअर्चेपेक्षा महान आहे.
गणपतीच्या एका प्रचलीत कथेत वसुंधरेला आईची उपमा देण्यात आलीय. सणांच्या गोंगाटात सामाजिक आशयांचंही स्खलन होवून गेलंय. या पार्श्वभूमीवर या डोळस सेवा दल सैनिकांनी हा उपक्रम आखला आहे.
राष्ट्र सेवा दल, गोरेगाव विभागातर्फे यंदाच्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ना तुमचं ना माझं पर्यावरण आहे आपल्या सर्वांचे या उपक्रमांतर्गत माती मध्ये नैसर्गिक खत आणि बी टाकून तयार केलेले मोदक आपल्या भेटीला येत आहेत.
महाराष्ट्रातील अनेक पूरग्रस्त भागात जी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे लोकांच्या मनात निराशा आलेली आहे.त्या साठी हा seeds मोदक एक नवी उमेद म्हणून उभारी घेवू शकतो. पुढच्या काही दिवसात मुंबईतील गणेशोस्तव मंडळाच्या,सामाजिक संस्था,कार्यकर्ते यांच्या माध्यमातून राष्ट्र सेवा दल हा प्रयत्न करू मागते आहे. कोकणातील सह्याद्रीच्या डोंगर रांगा मध्ये या बिया टाकून नव्याने जंगल वाढविण्याचा आमचा प्रयत्न असेल.
चला तर सर्वांनी मिळून हा प्रयत्न करू या….
संपर्क :
ज्योती बामगुडे :- 7045446357
स्वप्नाली गोंधळी:- 80978 23222
बीजमोदक उपक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले. तर तेजस साळसकर यांची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी निसार अली सय्यद,विशाल गोंधळी, स्वप्नाली गोंधळी,वैशाली महाडिक, नवदीप तुरे, अमर भगत, अलका खराडे, मनोज खराडे, चंद्रकला भोजने, श्रेयस तांबे, सुमित कांबळे, पौर्णिमा चौगुले, रवी घोडके ही टीम काम करत आहे. राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष कृपेश कांबळे, संघटक ज्योती बामगुडे यांचा उपक्रम राबवण्यात मोठा वाटा आहे.