Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्याच्या कमांड रुग्णालयात लहान मुलांसाठी जलद निदान आणि उपचार (अर्ली इंटरव्हेंशन) केंद्र

September 6, 2026
in आरोग्य, चांगल्या बातम्या
0
COmmand Hospital Pune

मुक्तपीठ टीम

भारतात दरवर्षी जन्मलेल्या २७ दशलक्ष मुलांपैकी सुमारे १०% मुले कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाने, व्यंगामुळे किंवा विलंबाने होत असलेली प्रगती यामुळे ग्रस्त असतात त्यामुळे पुढील आयुष्यात त्यांना गंभीर अपंगत्व येते. यांसारख्या समस्यांचे लावकरात लवकर निदान झाल्यास आणि या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने थेरपिस्टच्या चमूने जलद उपचार सुरु केल्याने अपंगत्व कमी करण्याची एक अनोखी संधी प्राप्त होते आणि पिडीत मुलाला त्याची जास्तीत जास्त क्षमता साध्य करण्यासाठी मदत होते. या संकल्पनेतून , भारत सरकारने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके ) सुरू केला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात जलद अपंगत्व निदान आणि उपचार (अर्ली इंटरव्हेंशन ) केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात अशा पहिल्या केंद्राचा नुकताच शुभारंभ झाला.

अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांना अनुसरून,सशस्त्र दलांनी पुणे येथील कमांड रुग्णालयात (दक्षिण कमांड ) पहिले जलद अपंगत्व निदान आणि उपचार (अर्ली इंटरव्हेंशन ) केंद्र (ईआयसी) स्थापन केले आहे, ८ ऑगस्ट रोजी आर्मी वाइव्हज वेलफेअर असोसिएशनच्या क्षेत्रीय अध्यक्ष अनिता नैन यांनी ,रुग्णालयाचे कमांडंट मेजर जनरल एम.एस . तेवटिया यांच्या उपस्थितीत या अत्याधुनिक सुविधेचे उद्घाटन केले.

मुलांमध्ये असलेल्या अपंगत्वाच्या विविध पैलूंवर काम करण्यासाठी आणि त्यांना सर्वोत्तम उपचार आणि त्याचे संभाव्य परिणाम सुनिश्चित करण्यासाठी या केंद्रात अनेक थेरपिस्ट – क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, विशेष शिक्षक, पोषणतज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ उपलब्ध असणार आहेत. या रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक मुलाची तसेच बालरोग तज्ञांकडे आणि आणि बालरोग न्यूरोलॉजी बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक मुलाची कोणत्याही दोष किंवा अपंगत्वाच्या जलद निदानाच्या अनुषंगाने पूर्व तपासणी केली जाईल, अशी माहिती या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना ,बालरोग विभागाचे प्रमुख कर्नल कार्तिक राम मोहन यांनी दिली. या तपासणीदरम्यान ज्या मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचे अपंगत्व किंवा विलंबाने होत असलेली प्रगती आढळली तर त्यांची ताबडतोब नावनोंदणी जलद अपंगत्व निदान आणि उपचार (अर्ली इंटरव्हेंशन ) केंद्रामध्ये केली जाईल आणि अनुकूल परिणाम साध्य करण्याच्या दृष्टीकोनातून , जन्मापासून ते ६ वर्षे वयाच्या मुलांवर सर्वोत्तम तज्ज्ञांकडून आवश्यक उपचार सुरू केले जातील.

समग्र उपचार कार्यक्रमांच्या अभावामुळे, अपंग मुलांच्या प्रगतीमध्ये अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने अशा प्रकारच्या केंद्राची बालरोगतज्ज्ञ यांना गरज भासत होती.

 

लिंक क्लिक करा आणि हेही वाचा:

पुण्यातील कमांड रुग्णालयात कर्क रोग रुग्णांसाठी उपचार केंद्राचे उद्घाटन

 

पाहा:


Tags: Early interventionGood news Morningpuneअर्ली इंटरव्हेंशनकमांड रुग्णालयगुड न्यूज मॉर्निंगजलद अपंगत्व निदानपुणे
Previous Post

कपड्यांच्या स्टॉलवरील गर्दीने जालन्यातील युवकांनी घेतली प्रेरणा, उभारला हातमाग उद्योग रोजगारही देणारा!

Next Post

घरोघरी तिरंगा: पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूरमधील ५० लाख घरांवर तिरंगा फडकणार!

Next Post
Tricolor Flag to hoist on 50 lakh houses in Pune, Satara, Solapur, Sangli and Kolhapur

घरोघरी तिरंगा: पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूरमधील ५० लाख घरांवर तिरंगा फडकणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!