Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्यातील कमांड रुग्णालयात कर्क रोग रुग्णांसाठी उपचार केंद्राचे उद्घाटन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Command Hospital

मुक्तपीठ टीम

पुण्यातील कमांड रुग्णालयात ३० ऑगस्ट २०२२ रोजी लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस नैन, परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेवा पदकप्राप्त, एडीसी,  यांच्या हस्ते १२० खाटांच्या  दुर्धर रोगांवरील  उपचार केंद्राचे (MDTC) उद्घाटन करण्यात आले.

हे केंद्र कमांड रुग्णालय संकुलाचा एक भाग आहे आणि डॉक्टर आणि निमवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समर्पित आणि अनुभवी चमूद्वारे कर्करोगाच्या रूग्णांना सर्वसमावेशक दर्जेदार सेवा देण्यासाठी समर्पित ऑपरेशन थिएटर, अतिदक्षता विभाग आणि डे केअर सुविधेसह अत्याधुनिक सुविधांनी पूर्णपणे सुसज्ज आहे.

केमोथेरपी, शस्त्रक्रिया आणि रेडिएशनसह कर्करोगाच्या रुग्णांचे निदान, वर्कअप आणि उपचार एकाच ठिकाणी मिळणारे हे केंद्र आहे आणि त्यात दोन खाटांचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट देखील समाविष्ट आहे. या नवीन सुविधेसह, कर्करोगाची काळजी आणि संशोधन नवीन उंची गाठेल आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या रुग्णांना अडचणीत मदत करेल.

पुण्याच्या कमांड रुग्णालयात लहान मुलांसाठी जलद निदान आणि उपचार (अर्ली इंटरव्हेंशन) केंद्र

पुण्याच्या याच कमांड रुग्णालयात लहान मुलांसाठी जलद निदान आणि उपचार (अर्ली इंटरव्हेंशन) केंद्र उभारण्यात आलं आहे. भारतात दरवर्षी जन्मलेल्या २७ दशलक्ष मुलांपैकी सुमारे १०% मुले कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाने, व्यंगामुळे किंवा विलंबाने होत असलेली प्रगती यामुळे ग्रस्त असतात त्यामुळे पुढील आयुष्यात त्यांना गंभीर अपंगत्व येते. यांसारख्या समस्यांचे लावकरात लवकर निदान झाल्यास आणि या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने थेरपिस्टच्या चमूने जलद उपचार सुरु केल्याने अपंगत्व कमी करण्याची एक अनोखी संधी प्राप्त होते आणि पिडीत मुलाला त्याची जास्तीत जास्त क्षमता साध्य करण्यासाठी मदत होते. या संकल्पनेतून , भारत सरकारने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके ) सुरू केला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात जलद अपंगत्व निदान आणि उपचार (अर्ली इंटरव्हेंशन ) केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात अशा पहिल्या केंद्राचा नुकताच शुभारंभ झाला.

अधिक माहितीसाठी लिंक क्लिक करा आणि वाचा:

पुण्याच्या कमांड रुग्णालयात लहान मुलांसाठी जलद निदान आणि उपचार (अर्ली इंटरव्हेंशन) केंद्र

पाहा:


Tags: Cancer Treatment CenterCommand Hospitalgood newsmuktpeethpuneकमांड रुग्णालयकर्क रोग उपचार केंद्रघडलं-बिघडलंचांगली बातमीपुणेमुक्तपीठ
Previous Post

G-20 देशांच्या परिषदेतील कार्यक्रम, बैठका पुणे, मुंबई, औरंगाबादमध्ये होणार

Next Post

निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी लवकरच एकात्मिक निवृत्ती वेतनधारक पोर्टल

Next Post
एकात्मिक निवृत्तिवेतनधारक पोर्टल

निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी लवकरच एकात्मिक निवृत्ती वेतनधारक पोर्टल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!