मुक्तपीठ टीम
पुणे येथील वायूदलाच्या तळाला राष्ट्रपती, रामनाथ कोविंद आणि सविता कोविंद यांचे आदरातिथ्य करण्याचा विशेष सन्मान मंगळवारी मिळाला. ‘भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे’ दर्शविणारा ‘७५ ‘ हा आकडा पुण्याच्या आकाशात साकारणारा ‘जॅग्वार’ लढाऊ विमानाचा ‘फ्लाय पास्ट’ हे हवाई कसरतींचे वैशिष्ट्य होते. राष्ट्रपतींनी अत्याधुनिक सुखोई – ३० (एसयू स्यू) एमकेआय विमानाच्या सिम्युलेटरमधून ‘उड्डाण’ केले.
कोविंद यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर ,दक्षिण पश्चिम वायूदलाच्या मुख्यालयाचे मुख्य अधिकारी कमांडिंग इन चीफ एअर मार्शल विक्रम सिंग आणि दक्षिण पश्चिम वायूदल मुख्यालयाच्या ‘वायूदल पत्नी कल्याण ’ संघटनेच्या प्रादेशिक अध्यक्षा डॉ. आरती सिंग यांनी त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर,पुणे वायूदल तळाचे दल अधिकारी कमांडिंग एअर कमोडोर एच. असुदानी यांनी राष्ट्रपतींना संचलनाची पाहणी नेण्यासाठी घेऊन गेले. यात एसयू (स्यू) -३० एमकेआय लढाऊ विमान आणि भारतीय बनावटीच्या आकाश क्षेपणास्त्र प्रणालीचा समावेश होता. यावेळी राष्ट्रपतींनी मोठ्या संख्येने लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरचा समावेश असलेल्या चित्तथरारक हवाई कसरती पाहिल्या.राष्ट्रपतींना लढाऊ विमानांची असामान्य क्षमता दाखवण्यात आली. विमानतळावरून प्रस्थान करण्यापूर्वी, त्यांनी पुण्यातील वायूदल तळाचा आढावा घेतला आणि हवाई कसरतींमध्ये सहभागी झालेल्या विमान दलातील अधिकारी आणि सैनिक तसेच वायूदलातील योद्ध्यांशी संवाद साधला.