Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दादरच्या लोकमान्य टिळक पुलाची पुनर्बांधणी, बबन चहावाल्याचं जीवनच संकटात!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
baban chahawala

मुक्तपीठ टीम

टपरीवरचा चहा हा चहाप्रेमींसाठी एक अमृततुल्य सुखचं. महाविद्यालय, ऑफिसमधून ब्रेक मिळाला की टपरीवरचा चहा प्यायला गर्दी जमते. त्यातही काही चहावाले आपल्या आपुलकीच्या गोडव्यानं चहाप्रेमींशी आपुलकीचे बंध जोडतात. असेच एक चहावाले म्हणजे दादर येथील केशवसुत पुलाखालील प्रसिद्ध बबन कांबळे यांची. बबन चहावाला एकेकाळी आपल्या चॉकलेट चहासाठी मुंबईत प्रसिद्ध होते. विशिष्ट सुगंध आणि चव असलेला बबन यांचा चॉकलेट चहा पिण्यासाठी राजकीय, सामाजिक, सिने, नाट्य, साहित्य अशा विविध क्षेत्रांतील मंडळी खास दादरला येत असतात. मात्र असं असताना दादर येथील लोकमान्य टिळक उड्डाणपुलाच्या रुंदीकरणात तीन ते चार बांधकामे अडथळा ठरत आहेत, त्यात बबन चहावाला यांचे दुकान अधिक घरदेखील आहे. एवढ्या वर्षांची परंपरा असणाऱ्या बबन यांचा हक्क डावलत त्यांची जागा अनधिकृत ठरवली जात आहे. त्यांच्याकडे पुरावे असल्याने त्यांना दुकानासाठी दादरमध्ये जागा मिळणे आवश्यक आहे. शिवसेनेसारखा मराठी माणसांसाठी लढण्याचा दावा करणारा पक्ष मनपात सत्तेत असल्याने या मराठी माणसाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा चहाप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

 

टीळक पुलाचा विकास, बबन चहावाल्याचा का विनाश?

  • दादर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा मुंबईतील महत्त्वाचा पूल आहे.
  • बांधकामाला अनेक दशके उलटल्याने त्याची पुनर्बांधणी आवश्यक आहे.
  • येत्या काळात त्याची आधुनिक पद्धतीने उभारणी केली जाणार आहे.
  • यासाठी सुमारे ३७५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
  • पुलाखालील हिंदू कॉलनीच्या पहिल्या गल्लीजवळ लखमशी नप्पू मार्गावरील तीन ते चार बांधकामे या पुलाच्या रुंदीकरणाआड येत असल्याचे स्पष्ट करत ती हटवण्यासाठी मनपाने नोटिसा पाठवल्या आहेत.
  • या बांधकामांमध्ये एक १५० चौरस फुटांचे स्टेशनरीचे दुकान अधिक घर असून ते प्रसिद्ध बबन चहावाला यांचे आहे.

 

बबन चहावाल्यांच्या घर-दुकानाला नोटीस का?

  • बबन यांना मनपाच्या माटुंगा एफ उत्तर विभाग कार्यालयाने हे बांधकाम अवैध असून ते संरक्षित असल्यास १५ दिवसांत योग्य ती कागदपत्रे घेऊन संपर्क साधण्यास कळवले आहे.
  • बांधकामासंबंधी बबन यांच्याकडे १९५३ पासूनचे पुरावे आहेत.
  • गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ मनपाला भरलेल्या मालमत्ता कराच्या पावत्या तसेच अन्य कागदपत्रे सादर केली आहेत.
  • पुरावे दिल्यानंतर मनपाने पुन्हा त्यांच्याशी संपर्क केलेला नाही, या दुकानावर पत्नी आणि मुलांसह चौघांचा उदरनिर्वाह चालतो.
  • हे बांधकाम हटवले जाणार असल्यास मला दादरमध्येच दुकानासाठी पर्यायी जागा मिळायला हवी, अशी मागणी बबन कांबळे यांनी सांगितले .

 

अधिकृत बांधकामेही संकटात

  • दादरचा टिळक पूल नव्याने बांधला जाणार आहे.
  • त्यामुळे अधिकृत बांधकामेही संकटात आहेत.
  • एकेकाळी दादर स्टेशनच्या बाहेर चहाचा व्यवसाय करणारे व पत्रकारितेतील अनेक लोकांचे लाडके असलेले प्रख्यात चहावाले बबनराव कांबळे यांचे अधिकृत दुकानही टिळक ब्रीजच्या कामामुळे संकटात आले आहे.
  • नाना पाटेकरांसारख्या महाराष्ट्रातील अनेक प्रख्यात व्यक्तीही बबन कांबळेंच्या चहाचे चाहते आहेत.
  • त्यांना दुकानाची पर्यायी जागा दादरमध्येच मिळायला हवी, अशी चहाप्रेमींची मागणी आहे.
  • शिवसेनेसारखा मराठी माणसांसाठी लढण्याचा दावा करणारा पक्ष मनपात सत्तेत असल्याने या मराठी माणसाला न्याय मिळेल, अशी चहाप्रेमींना अपेक्षा आहे.

Tags: Baban chahawala shoptilak bridgeबबन कांबळेलोकमान्य टिळक उड्डाणपुलशिवसेना
Previous Post

मुंबई उपनगर जिल्ह्यातील भूस्खलन होणाऱ्या धोकादायक ठिकाणी संरक्षक भिंतींसाठी ६१ कोटी

Next Post

राष्ट्रपतींचे पुणे हवाई दल तळावरून ‘सुखोई’च्या सिम्युलेटरमधून उड्डाण 

Next Post
सुखोई

राष्ट्रपतींचे पुणे हवाई दल तळावरून ‘सुखोई’च्या सिम्युलेटरमधून उड्डाण 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!