Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिल्ली सीमेवरच थांबण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार, हरियाणातूनही शेतकऱ्यांची ट्रॅक्टरसह कुमक…

January 29, 2021
in घडलं-बिघडलं
0
rakesh tikait

मुक्तपीठ टीम

२६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचारानंतर तीन दिवसांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेशचे पोलीस सिंघू आणि गाझीपूर सीमेवर कार्यरत राहिले आहेत. दोन महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. गुरुवारी गाझीपूर सीमा बंद करण्यात आली होती. तेथे वीज-पाणीपुरवठाही खंडित करण्यात आला होता. उत्तरप्रदेश सरकारच्या सर्वत्र आंदोलन थांबवण्याच्या आदेशानंतर, गाझियाबाद प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना गाझीपूर सीमा रिकामी करण्यास सांगितले. यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

कठोर कारवाईच्या भीतीने भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) प्रवक्ते राकेश टिकैत यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आंदोलन हे सुरूच राहील. कृषी कायदा मागे घ्या, अन्यथा ते आत्महत्या करतील. या टिकैत यांच्या समर्थनार्थ हरियाणाहून हजारो ट्रॅक्टर व गाड्या रात्री दिल्ली सीमेवर रवाना झाल्या.” टिकैट यांच्या मुझफ्फरनगर येथील सिसौली गावात आज एक महापंचायत बोलावण्यात आली आहे.

गेल्या २४ तासातील टॉप १० घडामोडी-
१.गाझिपूरमध्ये पोलीस तैनात झाल्यानंतर कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सरकारने लाठीमार करून आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला. आज गाझीपूर आणि सिंघू सीमेवर शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. शेतकर्‍यांना तोडणारे गद्दार हे देशद्रोही आहेत. दरम्यान, नोएडामध्ये कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर आणि अनेक पत्रकारांविरोधात आंदोलनाच्या अफवा पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

२. शेतकरी आंदोलनापासून आणखी दोन संघटनांनी माघार घेतली आहे. यात भारतीय किसान युनियन (लोकशक्ती) आणि भारतीय किसान युनियन (एकता) यांचा समावेश आहे. कृषीमंत्र्यांशी भेट घेतल्यानंतर दोन्ही संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी राष्ट्रीय कामगार शेतकरी संघटना आणि भारतीय किसान युनियन (भानू) यांनी या आंदोलनातून माघार घेतली होती.

 

३. उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमधील राकेश टिकैट यांच्या सिसौली गावात शेतकऱ्यांची मोठी गर्दी जमली आहे. भाकियूचे प्रमुख नरेश टिकैत यांनी तेथे पंचायत बोलावली. शुक्रवारीही येथे महापंचायत बोलावण्यात आली आहे. मात्र, नरेश टिकैत यांनी गुरुवारी दुपारी हे आंदोलन संपवण्याचे सांगितले होते. ते म्हणाले होते की पोलिसांनी शेतकर्‍यांना मारहाण केली.

 

४. गाझीपूर सीमेवर राकेश टिकैत यांच्या मंचावर एकच खळबळ उडाली. एक माणूस जबरदस्तीने स्टेजवर चढला. यानंतर राकेश टिकैत म्हणाले की, हा माणूस काठी घेवून स्टेजवर चढला होता. या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

 

५. आंदोलकांचा उत्साह कायम राहण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने सिंघूवर मोर्चा काढला. मोर्चाच्या वेळी हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी आपापसातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. या रॅलीत शेतकरी नेते गुरनाम चाधुनी, दर्शनपाल हे देखील उपस्थित होते. टिकरी सीमेवरही शेतकऱ्यांनी तिरंगा रॅली काढली. गाझीपूर येथेही मोर्चा काढण्याची योजना होती पण संध्याकाळ असल्याने मोर्चा काढण्यात आला नाही.

 

६. उत्तर प्रदेश पोलिसांनी दोन्ही बाजूंनी गाझीपूर सीमा बंद केली आहे. लोकांना तिथे न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशिरा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यानंतर गुरुवारी येथे पाणीपुरवठाही बंद करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी हरियाणाला जोडणारा रस्ता जेसीबीने खोदला आहे.

 

७. गाझीपूर सीमेवर गुरुवारी सायंकाळी भारतीय शेतकरी संघटनेचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी वादग्रस्त विधान केले. म्हणाले – “धरणे बंद होणार आणि अटकही होणार नाही. जर गोळी चालवायची असेल तर ती येथे चालवावी. या विधानानंतर थोड्याच वेळात एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये टिकैत रडत होते. ते म्हणाले, ‘भाजपचे लोक शेतकर्‍यांच्या हत्येचा कट रचत आहेत. मी शेतकऱ्यांना असे काही होऊ देणार नाही. जर कृषी कायदे मागे घेतले नाहीत तर मी आत्महत्या करेन.”

 

८. २६ जानेवारी रोजी गाझीपूर येथे २५ हजार शेतकरी होते. गुरुवारी केवळ ५००० निदर्शक उरले आहेत. सिंघू सीमेवर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ही संख्या ८० हजारांवर पोहोचली होती. आता ही संख्या २५ ते ३० हजारांच्या दरम्यान राहिली आहे.

 

९. २६ जानेवारीच्या हिंसाचारात सामील झालेल्या ४४ शेतकरी नेत्यांविरूद्ध गुरुवारी लुकआऊट नोटिस बजावण्यात आल्या आहेत. या नोटिस सीमावर्ती भागात तंबूंवर देखील पाठवण्यात आल्या आहेत. दिल्ली हिंसाचार प्रकरणात त्यांच्यावर कारवाई का होऊ नये, असा सवाल शेतकरी नेत्यांना केला आहे.

 

१०. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिलेल्या माहितीनुसार शीख समुदाय हा कट्टर देशभक्त आहे आणि त्याना बदनाम केलं जात आहे. भाजपचे लोक शेतकर्‍यांची बदनामी करीत आहेत. तसेच २६ जानेवारीला दिल्लीतील हिंसाचाराची चौकशी झाली पाहिजे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्यंदर जैन आणि दिल्ली जल मंडळाचे उपाध्यक्ष राघव चड्ढा यांना पोलिसांनी सिंघू सीमेवर आंदोलनाच्या ठिकाणी जाण्यापासून रोखले आहे.


Tags: Farmer Delhi Protestrakesh tikaitsinghu borderदिल्ली शेतकरी आंदोलनभाजपराकेश टिकैतशेतकरी आंदोलनशेतकरी ट्रॅक्टर मोर्चासिंघू सीमा
Previous Post

#व्हाअभिव्यक्त “वादग्रस्त निकाल देणाऱ्या ‘त्या’ न्यायाधीशांचं काय?”

Next Post

…मी येईन आणि मी पुन्हा येईनची ज्याची त्याची गोष्ट…उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री नाहीच होत!

Next Post
yashvant rav chavan and sharad pawar

...मी येईन आणि मी पुन्हा येईनची ज्याची त्याची गोष्ट...उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री नाहीच होत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!