मुक्तपीठ टीम
निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह ५ राज्यांच्या ६ जागांसाठी राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, मध्य प्रदेश आणि तामीळनाडूमध्ये या निवडणुका होतील. यात पश्चिम बंगाल, आसाम, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी १ आणि तामीळनाडूमध्ये २ जागांचा समावेश आहे. ४ ऑक्टोबरला मतदान होणार असून संध्याकाळपर्यंत निकाल जाहीर होईल.
राज्यसभेच्या रिक्त जागा खालीलप्रमाणे
- महाराष्ट्र – काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचं निधन
- मध्य प्रदेश – थावरचंद गेहलोत यांचा राजीनामा
- प. बंगाल – मानस रंजन भुनिया यांचा राजीनामा
- आसाम – बिस्वजीत दैनीमरी यांचा राजीनामा
- तामीळनाडू – के.पी.मुनूसामी यांचा राजीनामा
- तामीळनाडू – आर. वैथिलिंगम यांचा राजीनामा
निवडणुकीचं वेळापत्रक खालीलप्रमाणे
- १५ सप्टेंबर २०२१ – अधिसूचना जाहीर होणार
- २२ सप्टेंबर २०२१ – अर्ज करण्याची तारीख
- २३ सप्टेंबर २०२१ – अर्जाची छाननी होणार
- २७ सप्टेंबर २०२१ – अर्ज मागे घेण्याची तारीख
- ४ ऑक्टोबर २०२१ – मतदानाचा दिवस
- ४ ऑक्टोबर २०२१ – मतमोजणी होणार