Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“भोसरी जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी खडसेंचा पाय खोलात”

खडसेंनी गैरव्यवहार केला, गुन्हा घडताना ते भाजपमध्ये, ईडी कोर्टाचं निरीक्षण

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ED-Khadse

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. खडसेंनी भोसरी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसत आहे, असं निरीक्षण ईडी न्यायालयाने नोंदवलं आहे. तसंच गुन्हा घडला तेव्हा खडसे हे भाजपमध्य़े होते याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

ईडी न्यायालयाने काय म्हटलंय?

  • एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदावर असताना पदाचा गैरवापर केला.
  • स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना फायदा करुन दिला.
  • खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अशा परिस्थितीत जामीन देता येणार नाही, नाही तर समाजात वाईट संदेश जाईल.
  • खडसे हे महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाचा भाग आहेत, मात्र हा गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते, याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

भोसरी जमीन घोटाळा काय आहे?

  • युती सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूलमंत्री होते.
  • त्यांनी पुण्यातील भोसरीमध्ये ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला.
  • ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची फक्त ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता.
  • रेडीरेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.
  • हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता.
  • त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ मध्ये अधिग्रहण केला होता.
  • पण, उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे.
  • खडसे यांनी १२ एप्रिल २०१६ रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरीत निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला गेला.
  • पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांना भूखंड विक्री केल्याचं समोर आलं.
  • भोसरीतल्या जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ६ जुलै २०२१ रोजी अटक करण्यात आली होती.
  • १३ तास कसून चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली.
  • चौधरींना २ महिन्यांनंतरही जामीन मिळालेला नाही.
  • गिरीष चौधरींच्या अटकेनंतर काही तासांनंतरच खडसेंना ईडीने समन्स बजावलं.
  • ईडी कार्यालयात एकनाथ खडसेंची चौकशीही झाली होती.

Tags: BJPEDEknath KhadseNCPईडीएकनाथ खडसेएमआयडीसीगिरीश चौधरीराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

महाराष्ट्र दोन्ही डोस देण्यात देशात प्रथम! १ कोटी ७९ लाख संपूर्ण लसवंत!!

Next Post

महाराष्ट्रासह ५ राज्यांमधील राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणुका जाहीर

Next Post
rajysabha elections

महाराष्ट्रासह ५ राज्यांमधील राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणुका जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!