मुक्तपीठ टीम
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसंबंधित अनेक बातम्या समोर येत आहेत. १८ ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांचा ब्रेन डेड झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केल्याच्या बातम्या सर्वतेर आल्या होत्या. तसंच राजू श्रीवास्तव यांचं निधन झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवल्या गेल्या. दरम्यान, राजू यांचे मॅनेजर राजेश शर्मा यांनी त्यांचा ब्रेन डेड झालेला नाही. त्यांची प्रकृती आधीपेक्षा बरीच सुधारली आहे. सध्या ते कोमामध्ये आहेत, अशी माहिती दिली आहे. त्यांच्या भावाने ते लवकरच परततील. कॉमेडी करताना दिसतील, असा आशावादही व्यक्त केला आहे.
राजू यांचा ब्रेन डेड नाही, तर कोमात!
- राजेश शर्मा हे राजू श्रीवास्तव यांचे मॅनेजर आहेत.
- त्यांनी सांगितलं की, ‘राजू श्रीवास्तव यांची प्रकृती आधीच्या तुलनेत सुधारली आहे.
- त्यांच्या शरीरातील अवयव कार्यरत आहेत.
- त्यांची प्रकृती देखील स्थिर आहे.
- शर्मा यांनी पुढं सांगितलं की, राजू यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहेत.
- काही सकारात्मक अशा गोष्टी घडत आहेत.
- राजू यांच्या मेंदूला सूज आली होती.
- त्यांचा ब्रेन डेड झालेला नाही.
- आता त्यांच्या मेंदूला आलेली सूज कमी झाली आहे.
- राजू सध्या कोमा-सेमी कोमामध्ये आहेत.
- राजू यांची मुलगी अंतरा हिनं सांगितले की, ‘पप्पांवर डॉक्टर अजूनही उपचार करत आहेत.
राजू यांच्यावर उपचार करण्यासाठी नवीन डॉक्टर!!
- शर्मा यांनी पुढे सांगितलं की, राजू यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची टीम बदलण्यात आली आहे.
- याआधी त्यांच्यावर डॉ. अचला श्रीवास्तव उपचार करत होते परंतु आता दुसरे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.
- त्यानंतर राजू यांच्या तब्येतीमध्ये काही सकारात्मक बदल घडले आहेत.
मेंदूच्या काही नसा आकुंचन पावल्या !!
- १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी राजू श्रीवास्तव यांची तब्येत एकदम गंभीर झाली होती.
- त्यांच्या मेंदूचे काम अनियमित झाले.
- त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या मेंदूमध्ये काही इंजेक्शन दिली.
- त्या इंजेक्शनमुळे त्यांच्या मेंदूला सुज आली.
- परंतु आता ही सुज कमी झाली आहे.
- यावेळी राजू श्रीवास्तव यांचा ब्रेन डेड झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.