मुक्तपीठ टीम
राज्यात अतिरिक्त उस उत्पादनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. मराठवाड्यात सर्वाधिक ऊस शिल्लक आहे. यावर सरकारने अनेक पर्याय उपलब्ध करून दिले असले तरी अतिरिक्त उसाचाही प्रश्न हा कायम आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपाय सांगितला आहे. सरकारने हातामध्ये दंडुका घेतला तर १० दिवसांमध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागेल असे त्यांनी सुचवले आहे.
काय म्हणाले राजू शेट्टी?
- यंदाच्या शिल्लक उसामुळे शेतकरी हा उध्वस्त होणार आहे.
- त्यामुळे ऊस गाळपाचे नियोजन करणे हे महत्वाचे होते.
- पण संपूर्ण हंगामात या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच पण आता पावसाळा तोंडावर असतानाही ऊस उभाच असल्याने शेतकऱ्यांना आगामी हंगामातील पिके घेणेही मुश्किल झाले आहे.
- अतिरिक्त उसामुळे शेतकरी उध्वस्त होणार आहे.
- त्यामुळे ३० कारखान्यांनी रोज २ हजार टनाचे गाळप केले तर १० दिवसांमध्ये प्रश्न मार्गी लागणार आहे.
- मात्र, याची अंमलबजावणी होणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे.
…तर १० दिवसांमध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागेल!
- अतिरिक्त उसाबाबत साखर कारखान्यांना ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठरवून द्यावे.
- एवढेच नाही दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारने हातामध्ये दंडुका घेणे गरजेचे आहे.
- सरकारने मनावर घेतले तर १० दिवसांमध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागेल पण सरकारही ठोस भूमिका घेत नसल्याने हा प्रश्न रखडत गेला आहे.
- आता पावसाळा सुरु होत असतानाही राज्यात लाखांहून अधिक अतिरिक्त ऊस उभाच आहे.
- त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान होत आहे.