मुक्तपीठ टीम
सुपरस्टार रजनीकांत यांना ३ दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी रजनीकांत यांना चक्कर येत असल्याने त्यांना चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांची पूर्ण तपासणी झाली असून रजनीकांत यांनी रविवारी रात्री उशिरा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर घरी पोहोचल्याचा फोटो शेअर केला आहे. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
रजनीकांत घरी परतले
- यावेळी त्यांनी “घरी परतलो,” अशा आशयाची एक पोस्ट केली आहे. यात रजनीकांत यांनी एक फोटोही ट्वीट केला आहे. त्यांच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यावर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच अनेक चाहत्यांनी “लवकर बरे व्हा,” अशा कमेंट्ही केल्या आहेत.
- रजनीकांत यांचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते कारने त्यांच्या घरी पोहोचतात. त्यांची पत्नी लता दाराबाहेर त्यांची आरती करते.
गुरुवारी भरती करण्यात आली
- रजनीकांत यांना गुरुवारी चेन्नईमधील कावेरी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यावेळी त्यांच्यावर कॅरोटिड आर्टरी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतर काल अखेर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
- दरम्यान रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या निधनाच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. मात्र त्यांच्या पत्नी लता यांनी रजनीकांत यांची तब्बेत ठिक असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. रजनीकांत यांना नुकताच सिनेसृष्टीतील मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.