Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांनी दर्जेदार औषधांची निर्मिती करावी”- राजेंद्र शिंगणे

April 28, 2021
in सरकारी बातम्या
0
Rajendra Shingane

मुक्तपीठ टीम

 

कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर या औषधाचा पुरवठा सुरळीत व्हावा तसेच त्याचे उत्पादन कसे वाढवता येईल याची पाहणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, यांनी विविध औषध निर्मिती कंपन्यांना प्रत्यक्ष भेट दिली आहे. कंपनीने उत्पादनात वाढ करावी, दर्जेदार औषधे रुग्णांना उपलब्ध व्हावी यासाठी उत्पादकांनी प्रयत्नशील रहावे, असेही आवाहन डॉ. शिंगणे यांनी या कंपन्यांना केले आहे.

 

राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे व त्यावर उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा भासत आहे. रेमडेसिवीर या औषधाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्याचे उत्पादन कसे वाढवता येईल या अनुषंगाने डॉ. राजेंद्र शिंगणे, यांनी तारापूर MIDC तील मे. कमला लाईफ सायन्सेस या उसनवारी परवान्यावर काम करणाऱ्या कंपनीस भेट दिली व कंपनीच्या उत्पादन क्षमतेचा व प्रत्यक्ष होत असलेल्या उत्पादनाचा आढावा घेतला. कंपनी दर दिवशी ३५००० रेमडेसिवीर vial ची निर्मिती करत असून कंपनीने आतापर्यंत ६ लाख vials ची निर्मिती केली आहे, त्यातील ४ लाख vial सिप्ला कंपनीस दिल्या व सुमारे २ लाख vials पॅकिंगच्या प्रक्रियेत आहेत, असे कंपनीचे चेअरमन डॉ. झंवर यांनी सांगितले.

Min Rajendra Shingane 3

 

या कंपनीची रेमडेसिवीर liquid injection व lyophilized injection निर्माण करण्याची एकत्रित क्षमता २ लाख vials दर दिवस इतकी आहे.

 

मे. कमला लाईफ सायन्सेस ही injection निर्मिती करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी असून, ती त्यांच्या क्षमतेच्या १० टक्के उत्पादन सिपलासाठी करते व उर्वरित इतर औषधाचे उत्पादनासाठी इतर कंपन्या साठी करते.

 

कंपनी जुबिलेंट, हेटेरो, डॉ. रेड्डीज इ. यांचेसाठीही रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादन करणार असल्याचे डॉ. झंवर यांनी सांगितले.

 

सिप्ला कंपनीचा रेमडेसिवीर injection साठी लागणारा API (Active pharmaceutical ingredients) त्यांचेकडे असून ते liquid injection च्या ३५००० च्या ३ बॅचेस व lyophilized injection ची एक बॅच तयार करू शकतात. उत्पादनासाठीचा सहाय्यक घटक Betadex आयात केला जातो, त्याची कमतरता असल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होत असल्याचे डॉ. झंवर यांनी सांगितले. घटक पुरेश्या प्रमाणात उपलब्ध झाल्यास अधिक उत्पादन करता येईल व रेमडेसीविर चा तुटवडा निर्माण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

 

त्यानंतर डॉ. शिंगणे यांनी तारापूर MIDC येथिल मे. नेप्रड प्रा. ली. या कंपनीस भेट दिली. ही कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज या कंपनीसाठी रेमडीसीविर इंजेक्शन (lyophilized) उसनवार परवान्यावर निर्माण करते. त्यांची पहिली बॅच १२ मे, २०२१ रोजी बाजारात येईल. त्यांची रेमडीसीविर lyophilized निर्माण करण्याची क्षमता १५००० vials प्रतिदिन व liquid injection ची क्षमता १२००० vials प्रतिदिन आहे.

 

Lyophilized injection च्या पहिल्या बॅचच्या ४ दिवसानंतर दुसरी बॅच घेता येते . Sterility testing साठी १४ दिवस लागतात. हैदराबाद येथील प्रयोगशाळेत express sterility टेस्टिंगची परवानगी मिळाल्यास टेस्टिंग २ दिवसात करता येईल व ६ दिवसात बॅच release करता येईल.

 

तसेच liquid Inj ची बॅच दररोज उत्पादन करुन चाचणी हैद्राबाद येथे केल्यास तिसऱ्या दिवशी बॅच Release करता येईल, अशा प्रकारे राज्यात रेमडेसिवीरचे उत्पादन वाढविता येईल व मागणी पूर्ण करता येईल, असेही दोन्ही उत्पादक कंपन्यांकडून सांगण्यात आले.

 

या भेटीत शासन व अन्न व औषध प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन डॉ. राजेंद्र शिंगणे, यांनी दिले आहे.


Tags: rajendra shinganeremdesivir injectionराजेंद्र शिंगणेरेमडेसिवीर इंजेक्शन
Previous Post

“बहुधा केंद्र सरकारला लोकांना कोरोनाने मरु द्यायचंय”, दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारले

Next Post

कोरोना संकटावर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक साहित्य खरेदीचे विजय वडेट्टीवार यांचे आदेश

Next Post
vijay wadettiwar

कोरोना संकटावर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक साहित्य खरेदीचे विजय वडेट्टीवार यांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!