मुक्तपीठ टीम
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या शुभारंभ सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चित्रपटाचा नारळ वाढवण्यात आला. तर राज ठाकरेंच्या हस्ते सिनेमाला क्लॅप देण्याची विनंती करण्यात आली. याचवेळी राज ठाकरेंनी यांनी “वेडात मराठे वीर दौडले ४० चे प्रोड्युसर, दिग्दर्शक आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे” असे म्हणत त्यांच्या चेहऱ्यासमोर क्लॅप दिला. “वेडात मराठे वीर दौडले सात” या स्वराज्यासाठी दौडलेल्या सात मराठा वीरांची स्वसत्तेसाठी दौडलेल्या ४० बंडखोर आमदारांशी तुलना करणं हा भलताच पंच नवा वाद उसळवण्याची शक्यता आहे.
काल @RajThackeray जी ह्यानी शिंदेंच्या बंडाला “वेडात मराठे वीर दौडले ४०” असे म्हंटले..
हा मराठा इतिहासाचा आणि स्वामीनिष्ठेसाठी लढणार्या त्या मावळ्यांचा अपमान आहे..उपद्र्व देणार्या बेहलोल खानाचा कायमचा बंदोबस्त करण्याहे आदेश छत्रपती महाराजानी देताच कशाचीही पर्वा न करता.. १/n
— #शिवसैनिक Parag Sharad Mohite (@ParagSMohite) November 3, 2022
‘वेडात मराठे वीर दौडले ४०’चे प्रोड्युसर एकनाथ शिंदे!!
- सिनेमाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर दिसले.
- यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या चेहऱ्यासमोरच राज ठाकरे यांनी क्लॅप दिला.
- वेडात मराठे वीर दौडले ४० चे प्रोड्युसर, दिग्दर्शक आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, असा उल्लेख राज ठाकरेंनी मंचावर केला.
- यावेळी मंचावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
- पण तिथं हशा पिकवणारा राज ठाकरेंचा पंच भलताच वाटून वाद उसळण्याची शक्यता आहे.
अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार!!
- दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मेगा प्रोजेक्ट असलेल्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ची घोषणा करण्यात आली.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित या चित्रपटाचा नारळ वाढवण्यात आला.
- यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला तर राज ठाकरे यांना सिनेमाला क्लॅप देण्याची विनंती करण्यात आली.
- या सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांची ओळख कार्यक्रमात करण्यात आली.
- या चित्रपटात बिग बॉस मराठीचा विजेता विशाल निकम आणि स्प्लिट्सविला विजेता जय दुधाणे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
- प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विराट मडके,सत्या मांजरेकर, डॉ. उत्कर्ष शिंदे आणि नवाब शहा हे कलाकार दिसणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.